राजस्थानचे पंजाबसमोर १९२ धावाचं आव्हान
By Admin | Updated: April 21, 2015 21:42 IST2015-04-21T21:42:27+5:302015-04-21T21:42:27+5:30
किंग्ज इलेवन पंजाब संघासमोर राजस्थान रॉयल्सने १९२ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

राजस्थानचे पंजाबसमोर १९२ धावाचं आव्हान
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २१ - किंग्ज इलेवन पंजाब संघासमोर राजस्थान रॉयल्सने १९२ धावांचं आव्हान ठेवलं आहे.
टॉसचा कौल पंजाबच्या बाजुने लागल्यानंतर कर्णधार विरेंद्र सेहवागने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आजिंक्य राहणे आणि वॉटसन या सलामीच्या जोडीने आक्रमक फलंदाजी करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. आजिंक्यने ५४ चेंडूत ६ चौकार व २ षटकाराच्या मदतीने ७४ धावा फटकवल्या. तर वॉटसनने ३५ चेंडूत ४५ धावा केल्या. हुडा १९, नायर २५, स्मिथ ०, फॉक्नर १, आणि शेवटच्या षटकात स्टूअर्ट बिन्नीच्या ४ चेंडूत केलेल्या १२ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ६ बाद १९१ धावा केल्या.