राजस्थानचे केकेआरसमोर २०० धावांचं आव्हान
By Admin | Updated: May 16, 2015 21:49 IST2015-05-16T21:49:33+5:302015-05-16T21:49:33+5:30
कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द खेळताना राजस्थान रॉयल्सने ६ गडी गमावत केकेआरसमोर २०० धावांचं आव्हान ठेवले आहे.

राजस्थानचे केकेआरसमोर २०० धावांचं आव्हान
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द खेळताना राजस्थान रॉयल्सने ६ गडी गमावत केकेआरसमोर २०० धावांचं आव्हान ठेवले आहे.
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात टॉसचा कौल जिंकताच राजस्थानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून
आजिंक्य राहणे ३७ धावा, शेन वॉटसन नाबाद १०४ धावा (५९ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकार ), स्मिथ १४ धावा, सॅमसन ०८ धावा, फॉक्नर ०६ धावा, आणि नायरच्या १६ धावांच्या जोरावर राजस्थानने ६ गडी गमावून १९९ धावा केल्या. केकेआरकडून रसूलने सर्वाधिक ३ गडी बाद केले तर उमेश यादवला १ गडी गाद करता आला.