राजस्थान रॉयल्सचे मिशन ‘टॉप फोर’

By Admin | Updated: May 15, 2014 04:17 IST2014-05-15T04:15:38+5:302014-05-15T04:17:37+5:30

राजस्थान रॉयल्सला उद्या गुरुवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमवून आयपीएल-७ मध्ये टॉप फोरमध्ये स्थान पटकविण्याची संधी राहील.

Rajasthan Royals 'top four' | राजस्थान रॉयल्सचे मिशन ‘टॉप फोर’

राजस्थान रॉयल्सचे मिशन ‘टॉप फोर’

अहमदाबाद : राजस्थान रॉयल्सला उद्या गुरुवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमवून आयपीएल-७ मध्ये टॉप फोरमध्ये स्थान पटकविण्याची संधी राहील. दुसरीकडे दिल्लीला मात्र प्रतिष्ठा वाचविण्यासाठी किमान विजय मिळविण्याचे अवघड आव्हान असेल. राजस्थान संघ उद्या अडचणीत असलेल्या दिल्लीला आणखी कोंडीत पकडून चार गुणांसह ‘प्ले आॅफ’चा मार्ग सोपा करू शकतो. कर्णधार शेन वाटसन सलामीवीराची भूमिका कायम ठेवतो काय, हे पाहणे रंजक ठरेल. चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध त्याने या स्थानावर यशस्वी कामगिरी केली होती. चेन्नईविरुद्ध अंकित शर्मा यानेही चेंडू आणि बॅटचा प्रभाव सिद्ध केला. पण संजू सॅमसनला मधल्या फळीत परत आणण्याची योजना राजस्थानच्या डोक्यात असावी. आघाडीचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर अनेकदा झालेली घसरगुंडी थांबविण्यासाठी संजूची गरज भासू लागली आहे. रॉयल चलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध शानदार फलंदाजी केल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि जेम्स फॉल्कनर या आॅस्ट्रेलियन जोडीकडून कामगिरीची पुनरावृत्ती होऊ शकते. स्मिथ स्वत:च्या बळावर सामना फिरविण्याची ताकद राखतो व याक्षणी त्याच्या कामगिरीची संंघाला गरजही आहे. दिल्ली संघासाठी एकही बाब जमेची ठरू नये, हे दुर्दैव म्हणावे लागेल. या संघाला विजय मिळवायचा झाल्यास क्षेत्ररक्षणासह फलंदाजी आणि गोलंदाजी एकाच वेळी क्लिक होणे गरजेचे आहे. दिल्लीकडे केव्हिन पीटरसनसारखा कर्णधार असताना आणि मोक्याच्या क्षणी सहकार्‍यांना तो प्रेरणा देण्यात पटाईत असताना, संघाला अपयशाचे तोंड पाहावे लागत आहे, हे विशेष. क्ंिवटन डिकॉक हा देखील क्षमतेनुरूप खेळताना दिसत नाही. जेपी ड्युमिनी मात्र एखाद्या पर्वतासारखा चिवट फलंदाजी करीत पडझड रोखण्याचा नेहमी प्रयत्न करतो, पण त्याला इतरांची साथ मिळताना दिसत नाही.(वृत्तसंस्था)

Web Title: Rajasthan Royals 'top four'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.