पावसाचे सामन्यावर सावट?

By Admin | Updated: August 5, 2015 23:44 IST2015-08-05T23:44:37+5:302015-08-05T23:44:37+5:30

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या टीम इंडियाला भक्कम तयारी म्हणून श्रीलंका बोर्ड अध्यक्ष एकादशविरुद्ध तीन दिवसांचा

Rainy match on the rain? | पावसाचे सामन्यावर सावट?

पावसाचे सामन्यावर सावट?

कोलंबो : तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या टीम इंडियाला भक्कम तयारी
म्हणून श्रीलंका बोर्ड अध्यक्ष एकादशविरुद्ध तीन दिवसांचा सराव सामना उद्या गुरुवारपासून खेळायचा आहे. या
लढतीत पाऊस खलनायक ठरण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पावसामुळे काल भारतीय संघाला इन्डोअर सराव करावा लागला. गुरुवारी देखील हवामान खराब राहणार असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. कर्णधार या नात्याने कोहलीची ही पहिली पूर्ण मालिका ठरणार असल्याने विजयासह करियर सुरू करण्याची त्याची इच्छा आहे. शिखर धवन आणि मुरली विजय हे डावाला प्रारंभ करतील. गोलंदाजीत हरभजन आणि अमित मिश्रा यांचा अनुभव लंकेतील विकेटवर उपयुक्त सिद्ध होऊ शकतो. कोहलीचा फॉर्म सध्या चांगला नाही पण अनेकदा खराब परिस्थितीवर मात करीत चांगल्या खेळाद्वारे त्याने टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. माझा संघ युवा असला तरी चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असे कोहलीने आधीच सांगितले आहे.
लंका बोर्ड अध्यक्ष एकादशचे नेतृत्व लाहिरु तिरिमाने याच्याकडे आहे. या संघात डावखुरा फलंदाज उपुल थरंगा, कौशल सिल्व्हा, यष्टिरक्षक कुशल परेरा, मध्यमगती
वेगवान गोलंदाज लाहिरु गमागे आणि अष्टपैलू सचिन
पतिराना हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. भारतीय संघात लोकेश राहुल किंवा वरुण अ‍ॅरोन यापैकी कुणाला संधी दिली जाते याकडे लक्ष असेल. लंकेतील हवामान आणि खेळपट्टीचा अंदाज ओळखून कोहली पाच वेगवान गोलंदाजांना खेळवू शकतो. गोलंदाजांकडेही चांगल्या कामगिरीद्वारे टीकाकारांची तोंडे बंद करण्याची ही नामी संधी असेल.

यादव, अ‍ॅरोनकडून शिस्तबद्ध वेगवान मारा हवा : अरुण
कोलंबो : लंकेविरुद्ध १२ आॅगस्टपासून गाले येथे सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीत विजयासाठी उमेश यादव आणि वरुण अ‍ॅरोन यांच्याकडून शिस्तबद्ध वेगवान माऱ्याची अपेक्षा राहील,
अशी अपेक्षा टीम इंडियाचे गोलंदाजी कोच भारत अरुण यांनी व्यक्त केली. शिस्तबद्ध मारा करण्यासाठी वेगवान गोलंदाजांना आपली गती नियंत्रित ठेवण्याची गरज आहे का, असा प्रश्न विचारला सता अरुण म्हणाले,‘जे वेगवान मारा करतात तेचुका करतातच. वेगाने गोलंदाजांकडून शिस्तबद्ध मारा हा अ‍ॅक्शन आणि आक्रमकतेवर विसंबून असतो.
गोलंदाज वेगवान माराऱ्यासह शिस्तबद्ध मारादेखील करू शकतो. त्यामुळे यादव आणि अ‍ॅरोन यांनी गोलंदाजीत कुठलाही बदल न करता शिस्तबद्ध मारा करावा.’ भुवनेश्वर कुमार फॉर्ममध्ये परतल्यामुळे तामिळनाडूचे माजी वेगवान गोलंदाज राहिलेले अरुण आनंदी दिसले. ते म्हणाले,‘डावखुऱ्या फलंदाजांना चेंडू टाकताना भुवीला त्रास जाणवायचा. चेंडू कसा टाकावा याबद्दल त्याने भरपूर मेहनत घेतली.
आता पुन्हा तो आतमध्ये चेंडू वळविण्याचे तंत्र शिकला आहे.’ सध्याच्या गोलंदाजीबद्दल अरुण समाधानी आहेत. ईशांत शर्मा सातत्याने मारा करीत असल्याने अरुण यांच्यामते भारताकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यांनी कसोटी जिंकण्यासाठी पाच गोलंदाज खेळविण्याची कोहलीची बाजू योग्य असल्याचे सांगितले. लंकेत भारताचा रेकॉर्ड
फारसा चांगला नाही पण अरुण रेकॉर्डला महत्त्व देत नाहीत. ते म्हणाले,‘आधी काय घडले याकडे मी लक्ष देणार नाही.

भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे,
चेतेश्वर पुजारा, रिद्धिमान साहा, आर. अश्विन, हरभजनसिंग, उमेश यादव, ईशांत शर्मा, वरुण आरोन, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा.
श्रीलंका बोर्ड अध्यक्ष एकादश : लाहिरु तिरिमाने(कर्णधार), धनंजय डिसिल्व्हा, उपुल थरंगा, मिलिंदा सिरिवर्धने, कुशाल जनित परेरा, स्नेहन जयसूर्या, निसाला तिराका, कासुन रजीता, विश्वा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे, लाहिरु गमागे, धनुष्का गुणतिलेके, सचित पतिराना, निरोशन डिकवेला.

(वृत्तसंस्था)
 

Web Title: Rainy match on the rain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.