रैनाचा मोदींना न्यायालयात खेचण्याचा इशारा

By Admin | Updated: July 3, 2015 04:26 IST2015-07-03T04:26:34+5:302015-07-03T04:26:34+5:30

काही दिवसांपूर्वी आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी काही अव्वल क्रिकेटपटूंचा फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप केला होता. यामध्ये त्यांनी भारताचा स्टार खेळाडू सुरेश

Raina's suggestion to pull Modi into court | रैनाचा मोदींना न्यायालयात खेचण्याचा इशारा

रैनाचा मोदींना न्यायालयात खेचण्याचा इशारा

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी काही अव्वल क्रिकेटपटूंचा फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप केला होता. यामध्ये त्यांनी भारताचा स्टार खेळाडू सुरेश रैनाचे नाव देखील घेतले होते. एका रियल इस्टेट उद्योजकाकडून पैसे घेतल्याचा आरोप मोदींनी केला होता. हा आरोप रैनाने धुडकावला असून याविरोधात कायदेशीररीत्या कारवाई करणार असल्याचा इशारा देखील त्याने दिला आहे. त्याचबरोबर कधीच कोणत्याही गैरव्यवहारामध्ये माझा सहभाग नव्हता, असेही रैनाने स्पष्ट केले आहे.
रैनाने याविषयी अधिक सांगितले की, सध्या माझ्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांविषयी मी माझ्या चाहत्यांना व पाठिराख्यांना जागृत करु इच्छितो की, मी कायमच खिलाडूवृत्तीने आणि प्रामाणिकपणे खेळलो आहे. माझ्यावर ठेवण्यात आलेले सगळे आरोप खोटे असून मी कधीच कोणतेही गैरव्यवहार केलेले नाहीत. या विषयी योग्य पाऊल उचलण्यासाठी मी कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे.
लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मोदींनी काहीदिवसांपूर्वी ट्विटरवर एक पत्र टाकले होते, जे त्यांनी २०१३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) सीईओ डेव्ह रिचर्डसन यांना लिहिले असल्याचा दावा केला होता. यामध्ये त्यांनी तीन मोठ्या क्रिकेटपटूंचे नाव उघड केले होते. मोदींनी केलेल्या आरोपांनुसार या क्रिकेटपटूंनी एका नामांकीत बांधकाम व्यावसायिककडून रोख रक्कम व इतर स्वरुपात लाच घेतली होती. दरम्यान, आयसीसीने मोदी यांच्याकडून पत्र मिळाले असल्याची कबूली दिली असली तरी, पुराव्याअभावी या तिन्ही क्रिकेटपटूंना क्लीन चीट दिल्याचे देखील स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Raina's suggestion to pull Modi into court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.