आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रैनाची दशकपूर्ती
By Admin | Updated: July 31, 2015 00:47 IST2015-07-31T00:47:04+5:302015-07-31T00:47:04+5:30
भारताचा आघाडीचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये दहा वर्षे पूर्ण केली. या वेळी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत केलेल्या

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रैनाची दशकपूर्ती
नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये दहा वर्षे पूर्ण केली. या वेळी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत केलेल्या कामगिरीवर मी समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली.
३० जुलै २००५ रोजी रैनाने दांबुला येथे श्रीलंकाविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली. रैना सध्या भारतीय संघातील भरवशाचा खेळाडू आहे. या सर्व देदीप्यमान वाटचालीविषयी रैनाने सांगितले की, ‘माझा परिवार, बीसीसीआय, निवडकर्ते, मित्रपरिवार आणि चाहत्यांचे खूप आभार मानतो.’