रैना दुस-या वनडेतुनही 'आऊट'
By Admin | Updated: October 18, 2016 21:12 IST2016-10-18T21:12:33+5:302016-10-18T21:12:33+5:30
टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू सुरेश रैना न्यूझीलंडविरूद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यातही खेळू शकणार नाही. सुरेश रैना हा आजारी असून प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी

रैना दुस-या वनडेतुनही 'आऊट'
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू सुरेश रैना न्यूझीलंडविरूद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यातही खेळू शकणार नाही. सुरेश रैना हा आजारी असून प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्याला आणखी वेळ लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रैना दुस-या एकदिवसीय सामन्यात खेळणार नसल्याची घोषणा केली.
आजारी असल्यामुळे 16 ऑक्टोबरला धर्मशालामध्ये झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यातही रैना खेळू शकला नव्हता. गुरूवारी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.