रैना, जडेजा, भुवी, शमीची ङोप
By Admin | Updated: September 7, 2014 01:26 IST2014-09-07T01:26:38+5:302014-09-07T01:26:38+5:30
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत चांगली कामगिरी करणा:या सुरेश रैना, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या भारतीय खेळाडूंनी ताज्या मानांकन यादीत उत्तुंग ङोप घेतली आहे.

रैना, जडेजा, भुवी, शमीची ङोप
दुबई : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत चांगली कामगिरी करणा:या सुरेश रैना, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या भारतीय खेळाडूंनी ताज्या मानांकन यादीत उत्तुंग ङोप घेतली आहे.
भारताने ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे. भारताचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज सुरेश रैना याने फलंदाजीत सात, तर गोलंदाजीत दहा स्थानांची ङोप घेतली आहे. जडेजाने फलंदाजीत नऊ स्थानांची, तर गोलंदाजीत भुवनेश्वरकुमारने नऊ आणि मोहम्मद शमीने दहा स्थानांची ङोप घेतली आहे. सलामीवीर शिखर धवनने तीन स्थानांची ङोप घेत सातवा क्रमांक गाठला आहे. या मालिकेत निराशाजनक कामगिरी करणा:या विराट कोहलीला एका स्थानाचा फटका बसला असून, तो चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. तरीही तो टॉप टेनमधील अव्वल भारतीय खेळाडू बनला आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी सहाव्या क्रमांकावर कायम आहे. रैनाने मालिकेत 160 धावा केल्या आणि आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर तो ‘मालिकावीर’ बनला होता. या कामगिरीमुळे तो आता 26व्या स्थानावरून 19व्या स्थानावर आला आहे. रवींद्र जडेजा 53व्या स्थानावरून 44व्या स्थानावर आला आहे. बोट दुखावल्यामुळे मालिकेतून बाहेर पडलेला रोहित शर्मा दोन स्थानांनी घसरून 25व्या क्रमांकावर आला आहे. मोहम्मद शमीने मालिकेत सर्वाधिक आठ, तर भुवनेश्वर कुमारने पाच बळी घेतले आहेत. या कामगिरीमुळे भुवी 23व्या स्थानावरून 14व्या, तर शमी 31व्या स्थानावरून 21व्या स्थानावर पुढे आला आहे. (वृत्तसंस्था)
याउलट इंग्लिश खेळाडूंना मालिकेतील खराब कामगिरीचा फटका बसला असून ज्यो रुट सोडून इतर सर्वाचे मानांकन घसरले आहे.