रेल्वेने केले राजस्थानला 35 धावांत गारद
By Admin | Updated: November 12, 2014 01:43 IST2014-11-12T01:43:07+5:302014-11-12T01:43:07+5:30
मध्य विभाग विजय हजारे करंडक स्पर्धेत मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत रेल्वेने राजस्थानचा डाव केवळ 35 धावांत गुंडाळला.

रेल्वेने केले राजस्थानला 35 धावांत गारद
नागपूर : मध्य विभाग विजय हजारे करंडक स्पर्धेत मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत रेल्वेने राजस्थानचा डाव केवळ 35 धावांत गुंडाळला. विजयासाठी आवश्यक धावा रेल्वेने 5.3 षटकांत पूर्ण केल्या. भारतात स्थानिक वन-डे स्पर्धेमध्ये ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली.
लिस्ट ‘अ’ सामन्यात धावसंख्येच्या निचांकाची नोंद
सौराष्ट्र संघाच्या नावावर आहे. 2क्क्क् मध्ये मुंबईविरुद्ध सौराष्ट्र संघ
34 धावांत गारद झाला होता. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये जगातील ही सातव्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या आहे.
राजस्थानचा कर्णधार पंकज सिंगने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण राजस्थानच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. रेल्वेचा वेगवान गोलंदाज अनुरित सिंगने 8 षटकांत 16 धावांच्या मोबदल्यात 5, तर अमित मिश्रने 7.3 षटकांत 18 धावांत 5 बळी घेतले. राजस्थानतर्फे सर्वाधिक 13 धावा अरजित गुप्ताने केल्या.