राहुल, कर्णला ऑस्ट्रेलियाचे तिकीट!

By Admin | Updated: November 10, 2014 23:50 IST2014-11-10T23:50:53+5:302014-11-10T23:50:53+5:30

स्थानिक क्रिकेट स्पर्धामध्ये खो:याने धावा करणारा कर्नाटकचा लोकेश राहुल आणि फिरकीपटू कर्ण शर्मा यांना सातत्यपूर्ण कामगिरीची पोचपावती सोमवारी मिळाली.

Rahul, Karnal get Australia ticket! | राहुल, कर्णला ऑस्ट्रेलियाचे तिकीट!

राहुल, कर्णला ऑस्ट्रेलियाचे तिकीट!

रैनाचे कसोटीत पुनरागमन :  कर्णधार महेंद्रसिंह धोनी पहिल्या कसोटीला मुकणार 
मुंबई :  स्थानिक क्रिकेट स्पर्धामध्ये खो:याने धावा करणारा कर्नाटकचा लोकेश राहुल आणि  फिरकीपटू कर्ण शर्मा यांना सातत्यपूर्ण कामगिरीची पोचपावती सोमवारी मिळाली. आगामी ऑस्ट्रेलिया दौ:याकरिता या दोघांना 19 जणांच्या भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे, तर दुखापतीमुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनीला ब्रिस्बन येथे होणा:या पहिल्या कसोटीला मुकावे लागणार आहे. 
वन डेत षटकार-चौकारांची आतषबाजी करणा:या सुरेश रैनाचे कसोटी संघात पुनरागमन झाले असून, नमन ओझा यानेही स्थान पक्के केले आहे. सोमवारी येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बैठक पार पडली. या बैठकीत संघ निवड करण्यात आल्याचे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले. ऑसीच्या खडतर दौ:याकरिता निवड समितीने तरुणांना प्राधान्य दिले असून, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, हरभजन सिंह, अमित मिo्रा आणि प्रग्यान ओझा या अनुभवी खेळाडूंना बाकावरच बसण्याचा सल्ला दिला. दुखापतीमुळे वेस्ट इंडीज मालिकेत विo्रांती घेणा:या धोनीवर उपचार सुरू असल्याने तो ऑस्ट्रेलिया दौ:यातील ब्रिस्बन (4 ते 8 डिसेंबर) येथे होणा:या पहिल्या कसोटीत मुकावे लागणार आहे. या लढतीत विराट कोहली नेतृत्व संभाळणार आहे. दुखापतीतून पूर्णपणो बरा झाल्यानंतर धोनी भारतीय संघाला दुस:या कसोटीत जॉइन करेल, अशी माहिती पटेल यांनी दिली. 
 
यांची निवड योग्यच !
4स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्य राखणा:या लोकेश राहुल हा 1क्35 धावा करून गतवर्षी रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणा:या फलंदाजांमध्ये केदार जाधवपाठोपाठ दुस:या क्रमांकावर होता. नुकत्याच पार पडलेल्या दुलीप चषक स्पध्रेत राहुलने 185 व 13क् धावा करून खणखणीत शतक ठोकले. निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांची नजर सुरुवातीपासून राहुलच्या कामगिरीवर होती. तसेच, राहुलकडे भारत ‘अ’ संघाकडून ऑस्ट्रेलियात खेळण्याचाही अनुभव आहे.
 
427 वर्षीय कर्ण याने भारताच्या टी-2क् संघात याआधीच स्थान पक्के केले आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना त्याने 13 सामन्यांत 6.6क्च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या होत्या. मेरठच्या या खेळाडूने 2क्क्7नंतर 34  प्रथम o्रेणी सामन्यांत 66 विकेट्स घेतल्या.  निवडीनंतर कर्ण म्हणाला, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेदरम्यान मला महान लेग स्पिनर शेन वॉर्न यांना भेटण्याची मनापासून इच्छा आहे.
 
4नमन ओझा यालाही ऑस्ट्रेलियातील चांगल्या कामगिरीमुळे भारतीय संघात स्थान मिळाले आहे. राखीव फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून नमनची संघात निवड करण्यात आली असून, त्याने यंदा सलग चार शतके ठोकली आहेत. यातील तीन शतके ही ऑस्ट्रेलियातच केली आहेत. 
4नमन ओझाच्या निवडीबाबत सचिव संजय पटेल म्हणाले की त्याची निवड ही केवळ ब्रिस्बेन येथील पहिल्या कसोटीसाठी झाली आहे. त्यानंतर तो भारतात परतेल.
 
पहिली कसोटी : 4 ते 8 डिसेंबर, ब्रिस्बन  
दुसरी कसोटी : 12 ते 16 डिसेंबर, अॅडिलेड
तिसरी कसोटी : 26 ते 3क् डिसेंबर, मेलबर्न 
चौथी कसोटी : 3 ते 7 जानेवारी, सिडनी
 
4कसोटी मालिकेनंतर भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात तिरंगी मालिका होणार आहे.
 
रवींद्र, धवनला विo्रांती
4बीसीसीआयच्या बैठकीत o्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित दोन वन डेसाठी भारतीय संघ निवडण्यात आला. कोलकता (13 नोव्हेंबर) व रांची (16 नोव्हेंबर) येथे होणा:या या लढतीत सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना विo्रांती देण्यात आली आहे, तर वृद्धिमान सहा याला डच्चू दिला. 
4धवनच्या जागी रोहित शर्मा याने संघात पुनरागमन केले असून, सहाच्या जागी रॉबीन उथप्पा याला संधी मिळाली आहे. दुखापतीमुळे ईशांत शर्माला विo्रांती देण्यात आल्याने विनय कुमारवर गोलंदाजीची मदार असेल. 
 
अशी आहे संघबांधणी  
4पाच जलदगती गोलंदाज : ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार व वरुण एरॉन (यातील ईशांत, शमी आणि वरुण दुखापतीतून सावरत आहेत)
4तीन फिरकीपटू : आर अश्विन, रवींद्र जडेजा व कर्ण शर्मा
4फलंदाजीत समातोल : शिखर धवन व मुरली विजय यांच्यावर सलामीची जबाबदारी, तर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणो, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी मधल्या फळीत धावा करण्यासाठी उत्सुक आहेत. 
 
ऑस्ट्रेलिया दौरा : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, 
लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणो, रोहित शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान सहा, नमन ओझा, आर. अश्विन, कर्ण शर्मा, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, वरुण एरॉन
o्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणो, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, सुरेश रैना, रॉबीन उथप्पा, अक्षर पटेल, कर्ण शर्मा, आर. अश्विन, उमेश यादव, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, विनय कुमार, केदार जाधव.
 
 रैनाला लास्ट कॉल 
4सुरेश रैनाने वन डेत केलेल्या कामगिरीमुळे त्याला कसोटी कॉल मिळाला आहे. रैनाने भारतासाठी शेवटची कसोटी सप्टेंबर, 2क्12मध्ये खेळली होती. 2क्1क्मध्ये कसोटीत पदार्पण करणा:या रैनाला 2क्11च्या इंग्लंड दौ:यात अपयश आले होते. त्यानंतर 2क्12-13मध्ये न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत रैनाला कमबॅक करण्याची संधी होती; परंतु त्यातही तो अपयशी ठरला. त्यानंतर त्याला वन डे सामने खेळण्याचीच संधी मिळाली. गेल्या 16 लढतीत त्याने 4क्.61च्या सरासरीने 528 धावा केल्या आहेत. यातील 16क् धावा या त्याने इंग्लंड दौ:यावर चार सामन्यांत केल्या. 

 

Web Title: Rahul, Karnal get Australia ticket!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.