राहूल गांधी, रॉबर्ट वद्रांनीही घेतलाय माझा पाहुणचार - ललित मोदी

By Admin | Updated: July 4, 2015 14:44 IST2015-07-04T14:44:19+5:302015-07-04T14:44:19+5:30

राहूल गांधींनी माझा पाहुणचार स्वीकारल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कानावर घातलंय का याचाही खुलासा करावा अशी टिप्पणीही मोदींनी केली आहे

Rahul Gandhi, Robert Vadra have taken my hospitality - Lalit Modi | राहूल गांधी, रॉबर्ट वद्रांनीही घेतलाय माझा पाहुणचार - ललित मोदी

राहूल गांधी, रॉबर्ट वद्रांनीही घेतलाय माझा पाहुणचार - ललित मोदी

>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ४ - भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सळो की पळो करून सोडलेल्या ललित मोदींनी आता थेट राहूल गांधींनी आपला पाहुणचार घेतल्याचे ट्विट केले आहे. एवढेच नव्हे तर राहूल गांधींनी माझा पाहुणचार स्वीकारल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कानावर घातलंय का याचाही खुलासा करावा अशी टिप्पणीही मोदींनी केली आहे.
रोज एकेक हादरा देण्याचा शब्द ललित मोदी खरोखर पाळताना दिसत असून नवीन ट्विट्समध्ये आयपीएलच्या सामन्याचा संदर्भ असून राहूल गांधी व रॉबर्ट वद्रा यांनी माझ्या बॉक्समध्ये बसून सामना पाहिल्याचा व माझा पाहुणचार स्वीकारल्याचा संदर्भ आहे.
ललित मोदींनी रॉबर्ट वद्रा व राहूल गांधींचे आयपीएल सामना बघतानाचे फोटो अपलोड केले असून हे फोटो अस्सल आहेत, फोटोशॉपमध्ये एडिट केलेले नाहीत अशी पुस्तीही जोडली आहे.

Web Title: Rahul Gandhi, Robert Vadra have taken my hospitality - Lalit Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.