शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 5:12 PM

राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आगामी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

मुंबई : राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आगामी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत पदकाची लयलूट करून 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दावेदारी भक्कम करण्याची आवारेचा निर्धार आहे. पण, त्याला आशियाई स्पर्धेत 57 किलो गटाऐवजी 61 किलो वजनी गटातून या स्पर्धेत खेळावे लागणार आहे. हा निर्णय आपलाच असल्याचे, राहुलने स्पष्ट केले. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी बराच वेळ आहे आणि तोपर्यंत पुन्हा 57 किलो गटात आखाड्यात उतरू, असा विश्वास त्याने 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला. राहुलने २००८ मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. पुढच्याच वर्षी त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. त्यावेळी राहुलला 'लोकमत'च्या ' महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र त्याला पुरस्कार जिंकता आला नव्हता. २०१९ मध्ये मात्र त्याने या पुरस्कारावर नाव कोरले. नुकत्याच एका सोहळ्यात त्याला 'लोकमत'च्या ' महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराने गौरविण्यात आले.

त्यावेळी त्यानं ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचा निर्धार 'लोकमत'कडे व्यक्त केला होता. " ऑलिम्पिक स्पर्धेची निवड चाचणी स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्यात सर्वोत्तम कामगिरी करून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत प्रवेश मिळवणे, हे पहिले लक्ष्य आहे. सुरुवातीला दिल्लीत आलो तेव्हा दडपण यायचे. सतत हरण्याचीच भीती वाटायची. पण आता येथील वातावरणाशी आणि 'डावपेचां'शी चांगलाच सरावलो आहे. जिद्दीने पुढे चालत राहायचं, मग  कोणाला कितीही राजकारण खेळूदे,''असे मत त्याने व्यक्त केले होते.

राहुलने २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत यंदा त्याला संधी मिळावी अशी मागणीही होत आहे. मागील ऑलिम्पिक स्पर्धा पात्रता फेरीसाठीच्या स्पर्धेत आलेला अनुभव विसरून राहुलला यंदा ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचा पताका डौलाने फडकवायचा आहे. 

चीनमध्ये होणाऱ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठीचा संघफ्री स्टाईल  रवी कुमार ( 57  किलो), राहुल आवारे ( 61 किलो), बजरंग पुनिया ( 65 किलो), रजनीश ( 70 किलो), अमित धनकर ( 74 किलो), प्रविण राणा ( 79 किलो), दीपक पुनिया ( 86 किलो), विकी ( 92 किलो), सत्यव्रत कॅडियन ( 97 किलो), सुमित ( 125 किलो);  

ग्रेको रोमनमनजीत ( 55 किलो), ग्यानेंदर ( 60 किलो), विक्रम कुमार ( 63 किलो), रवींदर ( 67 किलो), योगेश ( 72 किलो), गुरप्रीत सिंग ( 77 किलो), हरप्रीत सिंग ( 82 किलो), सुशील कुमार ( 87 किलो), हरदीप ( 97 किलो), प्रेम कुमार ( 130 किलो). 

महिला संघसीमा ( 50 किलो), विनेश ( 53 किलो), ललिता सेहरावत ( 55 किलो), पूजा धांडा ( 57 किलो),  मंजू ( 59 किलो), साक्षी मलिक ( 62 किलो), नवज्योत कौर ( 65 किलो), दिव्या काकरान ( 68 किलो), किरण ( 72 किलो), पूजा ( 76 किलो). 

टॅग्स :Rahul Awareराहुल आवारेWrestlingकुस्ती