बीसीसीआयच्या करारात रहाणेला अ श्रेणीत बढती, रैनाचा पत्ता कट
By Admin | Updated: November 9, 2015 16:25 IST2015-11-09T16:25:20+5:302015-11-09T16:25:20+5:30
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणा-या अजिंक्य रहाणेला बीसीसीआयच्या २०१५ - १६ या कालावधीतील करारात अ श्रेणीत बढती मिळाली आहे.

बीसीसीआयच्या करारात रहाणेला अ श्रेणीत बढती, रैनाचा पत्ता कट
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणा-या अजिंक्य रहाणेला बीसीसीआयच्या २०१५ - १६ या कालावधीतील करारात अ श्रेणीत बढती मिळाली आहे. अजिंक्यचा अ श्रेणीत समावेश करण्यात आला असून यंदाच्या वर्षात फारशी चमकदार कामगिरी करु न शकलेल्या सुरेश रैनाचा अ श्रेणीतून पत्ता कट झाला आहे.
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधरण सभा सोमवारी पार पडली. या बैठकीत खेळाडूंच्या करारासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. सुरेश रैना व भूवनेश्वर कुमारचा अ ऐवजी ब श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. तर गेल्या वर्षी क श्रेणीत असलेल्या रॉबिन उथप्पाला यंदा क श्रेणीतूनही वगळण्यात आले आहे.
करारबद्ध खेळाडूंची श्रेणी खालीलप्रमाणे आहे
अ श्रेणी ( १ कोटी रुपये) - महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, आर अश्विन आणि अजिंक्य रहाणे
ब श्रेणी (५० लाख रुपये) - सुरेश रैना, अंबाती रायडू, रोहित शर्मा, मुरली विजय, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शमी
क श्रेणी (२५ लाख रुपये) - अमित मिश्रा, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी, वृद्धीमन साहा, मोहित शर्मा, वरुण अॅरोन, कर्ण शर्मा, रविंद्र जडेजा, के एल राहुल, धवल कुलकर्णी, हरभजन सिंह, एस अरविंद.