रहाणेचे नाबाद शतक, दुसऱ्या कसोटीवर विंडीजविरुद्ध भारताची पकड

By Admin | Updated: August 2, 2016 02:35 IST2016-08-02T02:35:29+5:302016-08-02T02:35:29+5:30

तोपर्यंत उपाहारानंतर पावसाच्या व्यत्ययात १७० षटकांत ८ बाद ४८८ पर्यंत मजल मारली होती.

Rahane's unbeaten century, India's grip on the West Indies in the second Test | रहाणेचे नाबाद शतक, दुसऱ्या कसोटीवर विंडीजविरुद्ध भारताची पकड

रहाणेचे नाबाद शतक, दुसऱ्या कसोटीवर विंडीजविरुद्ध भारताची पकड

किंग्स्टन : अजिंक्य रहाणेच्या(नाबाद १००) सातव्या शतकी खेळीच्या बळावर भारताने सोमवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अखेरचे वृत्त हाती आले तोपर्यंत उपहारानंतर पावसाच्या व्यत्ययात १७० षटकांत ८ बाद ४८८ पर्यंत मजल मारली होती.
यजमानांचा पहिला डाव १९६ धावांत आटोपला. भारताची एकूण आघाडी २९६ धावांची झाली असून दोन फलंदाज शिल्लक असल्याने या सामन्यावर देखील पकड निर्माण झाली आहे. अजिंक्यने २४ व्या कसोटीत २३१ चेंडूत १३ चौकार व दोन षटकारांच्या सहाय्याने शतक गाठले. चेसच्या चेंडूवर चौकार ठोकूनच त्याने शतकाचा आनंद साजरा केला.

Web Title: Rahane's unbeaten century, India's grip on the West Indies in the second Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.