रहाणेचे नाबाद शतक

By Admin | Updated: August 6, 2015 23:01 IST2015-08-06T23:01:49+5:302015-08-06T23:01:49+5:30

मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे याने भारत आणि श्रीलंका अध्यक्षीय एकादशविरुद्ध तीनदिवसीय क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी नाबाद

Rahane's unbeaten century | रहाणेचे नाबाद शतक

रहाणेचे नाबाद शतक

कोलंबो : मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे याने भारत आणि श्रीलंका अध्यक्षीय एकादशविरुद्ध तीनदिवसीय क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी नाबाद शतक ठोकले; परंतु कर्णधार विराट कोहली आणि अन्य आघाडी फळीतील फलंदाज रोहित शर्मा मात्र फ्लॉप ठरले.
भारताने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ६ बाद ३१४ धावा केल्या. रहाणे १0९ धावांवर खेळत आहेत.लोकेश राहुल (४३) आणि शिखर धवन (६२) या सलामीवीरांनी सलामीसाठी १0८ धावांची भागीदारी करताना भारताला चांगली सुरुवात करून दिली; परंतु ही भागीदारी तुटल्यानंतर भारताची स्थिती लवकरच ४ बाद १३३ अशी बिकट झाली.
भारताने दोन्ही सलामीवीरांशिवाय रोहित (७) आणि कोहली (८) यांना २५ धावांत गमावले. वेगवान गोलंदाज कासून रजिता याने रोहित, कोहली आणि धवन यांना बाद केले. त्यानेही तीन फलंदाज ४७ धावांत तंबूत धाडले.
रहाणेला चेतेश्वर पुजारा (४२) याच्या रूपाने चांगली साथ मिळाली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी १४२ धावांची भागीदारी करताना भारताचा डाव सावरला. अखेर पुजारा ६६ व्या षटकात तंबूत परतला. जेफ्री वंडारसे (७६ धावांत २ बळी) याने त्याला बाद केले. त्यानंतर रिद्धिमान साहा (६) हादेखील जास्त वेळ टिकू शकला नाही. तथापि, रहाणेने एक बाजू लावून धरली. त्याने आतापर्यंत १२७ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार व एक षटकार मारला. त्याला साथ देणारा रवीचंद्रन आश्विन दहा धावांवर खेळत आहे. या दोघांनी आतापर्यंत सातव्या गड्यासाठी ४१ धावांची नाबाद भागीदारी केली.
कोहलीने मुरली विजय याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धवनसोबत राहुल सलामीला आला होता. या सामन्यात दोन्ही संघ प्रत्येकी १५ खेळाडूंचा उपयोग करू शकतात; परंतु ११ खेळाडूच फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतात. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेस १२ आॅगस्टपासून गॅले येथे सुरुवात होणार आहे.

धावफलक
धावफलक : भारत (पहिला डाव) : लोकेश राहुल झे. गुणतिलक गो. निसाला गमागे ४३, शिखर धवन झे. परेरा गो. रजिता ६२, रोहित शर्मा त्रि.गो. रजिता ७, विराट कोहली झे. श्रीवर्धना गो. रजिता ८, अजिंक्य रहाणे खेळत आहे १0९, चेतेश्वर पुजारा झे. पतिराना गो. वांडरसे ४२, रिद्धिमान साहा झे. थिरिमाने गो. वांडरसे ३, रविचंद्रन आश्विन खेळत आहे १0, अवांतर : १0, एकूण : ७९ षटकांत ६ बाद ३१४. गडी बाद क्रम : १-१0८, २-१२१, ३-१३0, ४-१३३, ५-२६७, ६-२७३. गोलंदाजी : विश्व फर्नांडो १५-२-२९-0, निसाला गमागे १५-२-६५-१, कासून रजिता १३-२-४७-३, जेफ्री वंडारर्स २0-१-७६-२, लाहिरू गमागे १३-२-६६-0, मिलिंडा श्रीवर्धना ३-१-१४-0.

Web Title: Rahane's unbeaten century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.