सुरेश रैनाऐवजी रहाणे कर्णधार

By Admin | Updated: August 9, 2015 00:54 IST2015-08-09T00:54:43+5:302015-08-09T00:54:43+5:30

झिम्बाब्वे दौऱ्यात वन डे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्याचा निर्णय बीसीसीआयचा नव्हताच. आयपीएलचा माजी आयुक्त ललित

Rahane captain instead of Suresh Raina | सुरेश रैनाऐवजी रहाणे कर्णधार

सुरेश रैनाऐवजी रहाणे कर्णधार

नवी दिल्ली : झिम्बाब्वे दौऱ्यात वन डे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्याचा निर्णय बीसीसीआयचा नव्हताच. आयपीएलचा माजी आयुक्त ललित मोदीचा ई-मेल त्यामागे कारणीभूत असल्याचा खुलासा झाला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार झिम्बाब्वे दौऱ्यात सुरेश रैनाला कर्णधार बनविण्याचे जवळपास निश्चित झाले होते. पण बोर्डाच्या एका उच्चस्तर अधिकाऱ्याने केलेल्या हस्तक्षेपानंतर रहाणेकडे नेतृत्व सोपविण्यात आले. निवडकर्त्यांनी आधी रैनाला कर्णधारपदी निवडले होते. बीसीसीआयच्या एका मोठ्या अधिकाऱ्याच्या अट्टहासामुळे रैनाऐवजी रहाणेकडे नेतृत्व सोपविण्यात आल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. बीसीसीआयने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. वृत्तानुसार बीसीसीआयचे बरेच अधिकारी रैनाकडे नेतृत्व सोपविण्याच्या विचारात नव्हते. कारण त्याचे नाव मोदीच्या ई-मेलमध्ये आले होते. मोदीच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचेदेखील रैनाने संकेत दिले. मीडियात आलेले वृत्त बिनबुडाचे तसेच चुकीचे असल्याचे रैनाचे मत होते. (वृत्तसंस्था)

मोदी याने आयसीसीला लिहिलेल्या एका पत्रात रैना, जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो यांनी मोठी रक्कम घेऊन रियल इस्टेट कंपनीच्या मालकाला लाभ पोहोचविल्याचा आरोप केला होता. रैनाने मोदी यांच्या आरोपांचा इन्कार करीत मी कुठल्याही व्यापाऱ्याकडून कुठल्याही प्रकारची लाच स्वीकारली नाही, असे म्हटले होते.

Web Title: Rahane captain instead of Suresh Raina