रहाणेला संघाच्या चांगल्या कामगिरीचा विश्वास
By Admin | Updated: May 29, 2017 00:34 IST2017-05-29T00:34:57+5:302017-05-29T00:34:57+5:30
अजिंक्य रहाणे याने आपल्या क्षमतेनुरूप खेळल्यास भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आपल्याकडे राखण्यास यशस्वी ठरेल, असा विश्वास

रहाणेला संघाच्या चांगल्या कामगिरीचा विश्वास
लंडन : अजिंक्य रहाणे याने आपल्या क्षमतेनुरूप खेळल्यास भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आपल्याकडे राखण्यास यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
रहाणे म्हणाला, ‘‘चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खूप आव्हानात्मक होईल. प्रत्येक संघ चांगला आहे; परंतु आम्ही आमच्या क्षमतेनुरूप खेळू शकलो तर मला चांगल्या कामगिरीचा विश्वास आहे. ड्रेसिंगरूममधील मूडदेखील चांगला आहे. आम्ही पहिल्या दिवशी चांगला सराव केला. खेळाडूंत जबरदस्त आपसात ताळमेळ आहे.’’ लॉर्डस्वरील सराव विशेष आहे. कारण आपण आपले सर्वोत्तम कसोटी शतक येथे झळकावल्याचे रहाणे याने सांगितले.