राफेल नदालचे नववे विजेतेपद

By Admin | Updated: April 18, 2016 02:29 IST2016-04-18T02:29:21+5:302016-04-18T02:29:21+5:30

आपल्या कारकीर्दीतील शंभरावा अंतिम सामना खेळत असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सचा पराभव करून मोंटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आपले

Rafael Nadal's 9th winner | राफेल नदालचे नववे विजेतेपद

राफेल नदालचे नववे विजेतेपद

मोंटे कार्लो : आपल्या कारकीर्दीतील शंभरावा अंतिम सामना खेळत असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सचा पराभव करून मोंटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आपले नववे विजेतेपद जिंकले. या नवव्या विजेतेपदासाठी राफेलला चार वर्षे वाट पाहावी लागली होती. राफेल नदालने गायलला ७-५, ५-७, ६-० गुणांनी नमवित २८वे मास्टर्स टायटल जिंकले.
तत्पूर्वी बलाढ्य राफेल नदालने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेला २-१ असे नमवले. विजेतेपदासाठी नदालसमोर फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सचे कडवे आव्हान असेल.
स्पेनच्या नदालने स्पर्धेतील आपला दबदबा सिद्ध करताना कसलेल्या मरेविरुद्ध पिछाडीवर पडल्यानंतरही विजय मिळवला. या स्पर्धेत २००५ ते २०१३ पर्यंत सलग ४६ सामने जिंकण्याचा पराक्रम केलेल्या नदलला अंतिम फेरीसाठी तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. पहिल्या सेटमध्ये वेगवान खेळ करताना मरेने ६-२ अशी सहज बाजी मारत आघाडी घेतली होती.
मात्र, यानंतर नदालने जबरदस्त पुनरागमन करताना मरेला आपला हिसका दाखवत सलग दोन सेट जिंकताना २-६, ६-४, ६-२ अशी पिछाडीवरून बाजी मारली. सुमारे अडीच तास रंगलेल्या या चुरशीच्या लढतीत दोन्ही खेळाडूंनी झुंजार खेळ करताना उच्च दर्जाच्या टेनिसचे प्रदर्शन घडवले. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला, मोंफिल्सने आपल्याच देशाच्या विल्फ्रेड त्सोंगाचे तगडे आव्हान सलग दोन सेटमध्ये ६-१, ६-३ असे सहजपणे परतवून अंतिम फेरी गाठली होती.

या स्पर्धेत तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत नदाल आणि मरे एकमेकांसमोर लढले.
याआधी २२०९ व २०११ मध्ये दोन्ही खेळाडू उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध खेळले आणि दोन्ही वेळेला नदालने बाजी मारली होती.
मरेविरुद्धचा नदालचा
एकूण रेकॉर्ड १७-६ असा झाला आहे.
मोंफिल्सविरुद्ध नदालचा करिअर रेकॉर्ड ११-२ असा असून अंतिम फेरीत
नदाल जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

Web Title: Rafael Nadal's 9th winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.