शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

राफेल नदालच्या आवाक्यात आले १९ वे विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 06:57 IST

यूएस ओपन टेनिस । रशियाच्या दानिल मेदवेदेवविरुद्ध खेळणार निर्णायक लढत

न्यूयॉर्क : स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने इटलीचा माटियो बेरेटिनीवर मात करीत यूएस ओपन टेनिसमध्ये पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली. विक्रमी १९ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नजर असलेल्या नदालला अंतिम फेरीत रशियाच्या दानिल मेदेवेदेव याचे आव्हान मोडित काढावे लागणार आहे.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या नदालने आर्थर अ‍ॅश स्टेडियममध्ये बेरेटिनीवर ७-६, ६-४, ६-१ ने विजय नोंदविला. दुसºया उपांत्य सामन्यात मेदवेदेवने बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रोवचा ७-६, ६-४, ६-३ ने पराभव केला. नदालने यंदा येथे जेतेपद पटकविल्यास तो रॉजर फेडररच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विश्वविक्रमापासून केवळ एक पाऊल दूर राहील. तो रविवारी २७ वा ग्रँडस्लॅम अंतिम लढतीत खेळेल. मागच्या महिन्यात नदालने माँट्रियल अंतिम फेरीत मेदवेदेवला पराभूत केले होते.

नदालला सत्राच्या प्रारंभी ढोपराला जखम झाली होती. त्यातून सावरताना त्याने १२ व्यांदा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकविले. आता त्याची नजर चौथ्या अमेरिकन ओपन जेतेपदावर असेल. या स्पर्धेत फेडरर, पीट सॅम्प्रास आणि जिमी कोनोर्स यांनी प्रत्येकी पाच जेतेपदाचा मान मिळविला आहे.

मेदवेदेव २३ वर्षांचा असून प्रथमच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. मागच्या सहा आठवड्यात त्याचा रेकॉर्ड २० विजय आणि दोन पराभव असा राहिला. वॉशिंग्टन आणि कॅनडात तो उपविजेता राहिला. सिनसिनाटी ओपनचे त्याने जेतेपद पटकावले तर येथे अंतिम फेरीत दाखल झाला.

मेदवेदेव म्हणाला,‘अंतिम फेरी गाठल्याचा मोठा आनंद आहे. अमेरिकेत येत असताना अंतिम फेरीपर्यंत पोहोचेन याचा विचारही केला नव्हता.’मरात साफिन याने २००५ साली ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले होते. तेव्हापासून पुरुष ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठणारा मेदवेदेव रशियाचा पहिला खेळाडू ठरला. साफिनने २००० मध्ये येथे जेतेपदाचा मान मिळविला होता. त्यानंतर अंतिम फेरीमध्ये दाखल होण्याचा मान मेदवेदेवला मिळाला आहे. 

टॅग्स :Table Tennisटेबल टेनिस