राफेल नदाल - निशिकोरी भिडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:06 IST2018-04-23T00:06:06+5:302018-04-23T00:06:06+5:30

नदालने धडाकेबाज खेळ करताना, उपांत्य सामन्यात ग्रिगोर दिमित्रोव याला ६-४, ६-१ असे लोळवले.

Rafael Nadal - Nishikori will fight | राफेल नदाल - निशिकोरी भिडणार

राफेल नदाल - निशिकोरी भिडणार

माँटे कार्लो : जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू स्पेनचा राफेल नदाल याने एकतर्फी रंगलेल्या सामन्यात बाजी मारत, माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अन्य एका सामन्यात जपानच्या केई निशिकोरी याने तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात विजय मिळविताना अंतिम फेरीत प्रवेश केला.
नदालने धडाकेबाज खेळ करताना, उपांत्य सामन्यात ग्रिगोर दिमित्रोव याला ६-४, ६-१ असे लोळवले. नदलाच्या ताकदवान आणि वेगवान खेळापुढे दिमित्रोवचा काहीच निभाव लागला नाही. दुसरीकडे झालेल्या चुरशीच्या सामन्यात निशिकोरीला विजयासाठी स्पर्धेतील तृतीय मानांकित अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवविरुद्ध झुंजावे लागले. तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात निशिकोरीने पहिला सेट गमावल्यानंतर, सलग दोन सेट जिंकताना ३-६, ६-३, ६-४ अशी बाजी मारली.
माँटे कार्लो स्पर्धेत नदालचा जबरदस्त दबदबा राहिला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत केवळ तीन खेळाडूंनाच नदालला पराभूत करण्यात यश आले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Rafael Nadal - Nishikori will fight

टॅग्स :Sportsक्रीडा