‘राफा’ची दणक्यात सुरुवात!

By Admin | Updated: May 27, 2015 01:16 IST2015-05-27T01:16:11+5:302015-05-27T01:16:11+5:30

माजी विजेत्या स्पेनच्या राफेल नदालने (राफा) यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतही दणक्यात सुरुवात केली आहे.

'Rafa' started in the beginning! | ‘राफा’ची दणक्यात सुरुवात!

‘राफा’ची दणक्यात सुरुवात!

पॅरिस: माजी विजेत्या स्पेनच्या राफेल नदालने (राफा) यंदाच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतही दणक्यात सुरुवात केली आहे. त्याने फ्रान्सच्या क्विटेन हेल्सचा ६-३,
६-३, ६-४ ने सहज पराभव केला. दुसरीकडे नोवाक जोकोवीचने जे. नैनमीनीजचा ६-२, ७-५, ६-२ असा पराभव केला. भारताचा महेश भूपती व आॅस्ट्रेलियाचा त्याचा जोडीदार नीक किरगियोस यांना लुकास पोइले व तनाशी कोकिनाकिस
यांच्याकडून ३-६, १-६ असा पराभव पत्कारावा लागला. महिलांच्या एकेरीत सेरेना विल्यम्सने ए हलवॅक कोव्हाला ६-२, ६-३ असे नमविले.
जगप्रसिद्ध रोलॅँड गॅरोस स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत राफेल नदालचे वर्चस्व राहिले आहे. त्याने आज या मैदानावरील कारकिर्दीतील ६७वा विजय साजरा केला. त्याने हा सामना एक तास आणि ४९ मिनिटांत जिंकला. जगात २९६व्या क्रमांकावर असलेल्या क्विटेनविरुद्ध
राफेल नदालला विजयासाठी विशेष संघर्ष करावा लागला नाही. त्याने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले.
१९ वर्षीय क्विटेनविरुद्ध पहिल्या सेटमध्ये नदालने ६-३ ने आघाडी मिळवली. त्यानंतर मात्र क्विटेनचा खेळावरचा
ताबाच सुटला. त्याने दुसऱ्या सेटमध्ये जवळपास ५२ चुका केल्या. याचा फायदा उठवत नदालने दुसऱ्या सेटमध्ये
४-२ आघाडी मिळवली होती. हा
सेटही त्याने ६-३ अशा फरकाने जिंकला. निर्णायक सेटमध्ये क्विटेनने सर्व शक्ती पणाला लावली; मात्र नदालपुढे तो अपयशी ठरला
दरम्यान, नदालला उपांत्यपूर्व फेरीत जगातील अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकाविचविरुद्ध खेळावे लागेल. तसेच त्याला अंतिम ३२ खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यासाठी स्पेनच्याच निकोलस अल्माग्रो आणि उक्रेनच्या अ‍ॅलेक्झांड्रो यांच्यातील विजेत्याविरुद्ध मैदानात उतरावे लागेल. रोहन बोपन्ना व फ्लोरियन मर्जिया यांची बुधवारी लढत होईल.
(वृत्तसंस्था)

कॅरोलिनचाही शानदार विजय
महिला गटात, डेन्मार्कची पाचवी मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीने शानदार विजय नोंदवला. तिने इटलीच्या कॅरीन क्नाफचा ६-३, ६-० ने पराभव केला. डेन्मार्कची ही माजी अव्वल मानांकित खेळाडू रोलॅँड गॅरोस मैदानावर उपांत्यपूर्व फेरीपर्यंतही पोहोचू शकलेली नाही. आता ती अंतिम सहा सामन्यांसाठी प्रयत्न करेल. दुसरीकडे, २७ वर्षीय इटलीची क्नाफ ही वर्षातील दुसरे ग्रॅण्डस्लॅम खेळत आहे. गेल्या आठवड्यात तिने नुरेमबर्ग येथील विजेतेपद पटकाविले होते. विजेत्या कॅरोलिनचा सामना आता जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जविरुद्ध होणार आहे. ज्युलियाने अमेरिकेच्या कोको वॅँडवेघेचा ६-२, ५-७ आणि ६-१ ने पराभव केला होता.

पेट्राचा संघर्ष
फेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत चौथी मानांकित पेट्रा क्विटोव्हाला संघर्ष करावा लागला. विम्बल्डनची चॅम्पियन असलेल्या या खेळाडूला न्यूझीलंडच्या ८०व्या मानांकित मरिना इराक्विकने चांगलेच झुंजवले. अखेर अडीच तासांच्या संघर्षानंतर पेट्रा हिने बाजी मारली. तिने हा सामना ६-४, ३-६, ६-४ ने जिंकला. क्विटोही २०१२ मध्ये पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी खेळाडू आहे. त्यानंतर तिने नुकतेच माद्रिद येथे क्ले कोर्टवरील विजेतेपद पटकाविले आहे.

 

Web Title: 'Rafa' started in the beginning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.