आर अश्विनने तोडला कपिल देव यांचा रेकॉर्ड
By Admin | Updated: February 24, 2017 17:38 IST2017-02-24T17:38:48+5:302017-02-24T17:38:48+5:30
भारतीय क्रिकेटमध्ये गोलंदाजीचे नवनवे रेकॉर्ड आपल्या नावे करणा-या आर अश्विनने अजून एका विक्रमाला गवसणी घातली आहे

आर अश्विनने तोडला कपिल देव यांचा रेकॉर्ड
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 24 - भारतीय क्रिकेटमध्ये गोलंदाजीचे नवनवे रेकॉर्ड आपल्या नावे करणा-या आर अश्विनने अजून एका विक्रमाला गवसणी घातली आहे. शुक्रवारी आर अश्विनने जेव्हा मिशेल स्टार्कची विकेट घेतली तेव्हा त्याच्या नावे एका नव्या विक्रमाची नोंद झाली. ऑस्ट्रेलियाविरोधात खेळत असताना दुस-या दिवशी घरच्या मैदानावर 10 वा कसोटी सामना खेळताना स्टार्कची विकेट 64 विकेट्स आपल्या नावावर केल्या. यासोबतच आर अश्विनने भारताचे माजी कर्णधार आणि गोलंदाज कपिल देव यांचा रेकॉर्ड तोडला.
1979-80 दरम्यान मायदेशात खेळताना कपिल देव यांनी 13 कसोटी सामन्यांमध्ये 63 विकेट्स घेतले होते. ऑस्ट्रेलियाविरोधात 23.22 च्या सरासरीने 28 विकेट्स घेतले होते. या मालिकेत त्यांचा स्ट्राईक रेट 47.8 होता. यानंतर पाकिस्तानविरोधात खेळताना कपिल देव यांनी 17.68 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतले होते.
आर अश्विनने ऑक्टोबर 2016 मध्ये न्यूझीलंडविरोधात खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यात 27 विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर इंग्लंडविरोधात खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 28 विकेट्स आपल्या नावावर केले होते. बांगलादेशविरोधात खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात आर अश्विनने सहा विकेट्स घेतल्या होत्या. पुण्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात आर अश्विनने तीन विकेट्स घेतल्या आहेत. या मालिकेतील तीन सामने अद्याप खेळणे बाकी आहे.