क्विंटोन डिकॉकला दंड
By Admin | Updated: May 11, 2015 02:34 IST2015-05-11T02:34:35+5:302015-05-11T02:34:35+5:30
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा फलंदाज क्विंटोन डिकॉक याला पंचांच्या निर्णयावर असमाधान व्यक्त केल्याबद्दल सामन्यातील पाच टक्के रक्कम दंड भरावा लागला़

क्विंटोन डिकॉकला दंड
रायपूर : दिल्ली डेअरडेव्हिल्सचा फलंदाज क्विंटोन डिकॉक याला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये बाद दिल्यानंतर पंचांच्या निर्णयावर असमाधान व्यक्त केल्याबद्दल सामन्यातील पाच टक्के रक्कम दंड भरावा लागला़ आयपीएलने एका निवेदनाद्वारे सांगितले की, आयपीएल खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांच्या आचारसंहितेचे लेवल एकचे उल्लंघन केल्याप्रकरणी डिकॉकला दोषी ठरवून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली़