‘पीडब्लूएल’मधून गीता, बबिता बाहेर होणार?

By Admin | Updated: January 9, 2017 00:56 IST2017-01-09T00:56:49+5:302017-01-09T00:56:49+5:30

आधीच स्टार खेळाडू बाहेर पडल्याने अडचणीत आलेल्या पीडब्लूएलला आणखी एक झटका बसला.

'PWL' will be out of the Gita, Babita? | ‘पीडब्लूएल’मधून गीता, बबिता बाहेर होणार?

‘पीडब्लूएल’मधून गीता, बबिता बाहेर होणार?

नवी दिल्ली : आधीच स्टार खेळाडू बाहेर पडल्याने अडचणीत आलेल्या पीडब्लूएलला आणखी एक झटका बसला. गीता फोगाट आणि बबिता या बहिणी या सत्रात खेळू शकतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गीताबाबत विरोधाभासी बातम्या बाहेर येत आहेत, तर बबिताकुमारी ही दुखापतग्रस्त आहे.
या दोघींच्या आयुष्यावर चित्रपट निघाल्यावर त्यांची लीगमध्ये मागणी वाढली. उत्तर प्रदेश फ्रँचायझीने या दोघींची निवड केली. तसेच चित्रपटाच्या यशाचा फायदा घेण्यासाठी संघाचे नाव ‘युपी दंगल’ असेही ठेवले; मात्र आता दोन्ही स्टार खेळाडूंच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
भारतीय कुस्ती महासंघानुसार उत्तर प्रदेश संघाने गीता आणि बबिता यांच्यासाठी पर्यायी खेळाडूंची मागणी केली. पिंकी हिला ५३ किलो महिला गटात बबिताला पर्याय म्हणून निवडण्यात आले, तर मनीषा महिला ५८ किलोगटात गीताची जागा घेईल.
रेश्मा माने हिला वजन कमी करण्यास सांगण्यात आले आहे. कारण ती मनीषापेक्षा चांगली खेळाडू आहे. डब्लूएफआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘गीता आणि बबिता या स्पर्धेतून बाहेर पडणार नाही, त्या संघासोबतच राहतील; मात्र शक्यता आहे की, त्या स्पर्धेत पुढे सहभागी होऊ शकणार नाही.’’

Web Title: 'PWL' will be out of the Gita, Babita?