पी.व्ही.सिंधूने पटकावले मलेशियन मास्टर्सचे जेतेपद
By Admin | Updated: January 24, 2016 15:33 IST2016-01-24T14:16:15+5:302016-01-24T15:33:59+5:30
भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने क्रिस्टी ग्लिमॉरचा २१-१५,२१-९ असा पराभव करत मलेशियन मास्टर्स ग्रँड पिक्स स्पर्धेत विजय मिळवला आहे.

पी.व्ही.सिंधूने पटकावले मलेशियन मास्टर्सचे जेतेपद
>ऑनलाइन लोकमत
पेनांग, दि. २४ - भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने अतिशय चमकदार खेळ करत मलेशियन मास्टर्स ग्रँड पिक्स स्पर्धेत विजय मिळवला आहे. अंतिम फेरीत सिंधूने स्कॉटलंडच्या क्रिस्टी ग्लिमॉरचा २१-१५,२१-९ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.
२०१३ साली झालेल्या फ्रेंच ओपनमध्ये थर्ड सीडेड सिंधूला ग्लिमॉरकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र आज झालेल्या सामन्यात तिने त्या पराभवाचा वचपा काढत ग्लिमॉरचा सरळ सेट्समध्ये पराभव केला.