शहरं
Join us  
Trending Stories
1
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
4
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
5
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."
6
Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'
7
गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात; बस आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत ६ जण ठार!
8
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
9
सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
10
रेश्मा केवलरमानी यांचा अमेरिकेत डंका! टाईम मासिकाच्या टॉप १०० यादीत एकमेव भारतीय
11
CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...”
12
ऑटोमॅटीक कार चालवत असाल किंवा एकाच जागी बसून असाल तर काय कराल? डीव्हीटी काय असतो...
13
Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
14
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
15
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
16
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
17
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
18
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
19
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
20
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली

Paris Olympics 2024 : आयुष्यातील सर्वात कठीण पराभव! पीव्ही सिंधू भारावली; मोठ्या प्रश्नावर अखेर सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 15:35 IST

pv sindhu olympics 2024 : पीव्ही सिंधूचे ऑलिम्पिक २०२४ मधील आव्हान संपुष्टात आले.

Paris Olympic 2024 : पीव्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये पदकाची हॅटट्रिक मारेल असे तमाम भारतीयांना अपेक्षित होते. पण, गुरुवारी रात्री झालेल्या लढतीत भारताच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला. चीनच्या खेळाडूने सिंधूचा पराभव करून तिचे स्पर्धेतील आव्हान संपवले. स्पर्धेबाहेर होताच सिंधूने एक भावनिक पोस्ट करत आपला संघर्ष मांडला. तसेच तिने भवितव्याबद्दल भाष्य करून निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. गुरुवारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूचा (PV Sindhu) सामना झाला. चीनच्या हे बिंग जिओ (He Bingjiao) हिने सिंधूचा २१-१९, २१-१४ असा पराभव करत तिचा प्रवास संपवला.  पराभवानंतर सिंधूने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, पॅरिस २०२४ हा एक सुंदर आणि तितकाच कठीण प्रवास होता... पण, निराशाजनक पराभव झाला. हा पराभव माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण आहे. हे स्वीकारायला थोडा वेळ लागेल, पण आयुष्य जसजसे पुढे सरकत जाईल तसतसे मी त्याच्याशी जुळवून घेईन अशी मला खात्री आहे. पॅरिस २०२४ चा प्रवास ही एक लढाईच होती. दोन वर्षे दुखापतीचा सामना केल्यानंतर इथपर्यंत पोहोचला आले. या आव्हानांना न जुमानता इथे उभे राहून तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले यामुळे मला खरोखरच धन्य वाटते.

तसेच या स्तरावर मी स्पर्धा करून आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे एका पिढीला प्रेरणा दिल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते. या काळात अनेकांचे मेसेजेस आले... यामुळे मोठा दिलासा मिळत गेला. मी आणि माझ्या टीमने पॅरिस २०२४ साठी आमच्याकडे जे आहे ते सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. माझ्या भवितव्याबद्दलही मला व्यक्त व्हायचे आहे. मी स्पष्ट करते की, एका छोट्या विश्रांतीनंतर मी पुन्हा माझे काम सुरू करेन. माझ्या शरीराला आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे माझ्या मनाला त्याची खूप गरज आहे. तसेच मला खूप आवडत असलेला खेळ खेळण्यात अधिक आनंद मिळवण्यासाठी मी पुढील प्रवासाचे काळजीपूर्वक मूल्यमापन करण्याची योजना आखत आहे.

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने रविवारी पदकाचे खाते उघडले.तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.  

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintonparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Indiaभारत