पी.व्ही. सिंधूला कांस्य
By Admin | Updated: August 31, 2014 02:21 IST2014-08-31T02:21:22+5:302014-08-31T02:21:22+5:30
पी. व्ही. सिंधूला पराभव पत्करावा लागल्याने विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सलग दुस:या वर्षी कास्यपदकावर समाधान मानावे लागले.

पी.व्ही. सिंधूला कांस्य
कोपनहेगन : भारताची स्टार खेळाडू आणि या स्पर्धेत 11वे मानांकन असलेली पी. व्ही. सिंधूला महिलांच्या एकेरीत स्पेनच्या कॅरोलीना मारीनकडून सरळ दोन सेटमध्ये पराभव पत्करावा लागल्याने विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सलग दुस:या वर्षी कास्यपदकावर समाधान मानावे लागले.
बालेरूप सुपर एरेनामध्ये झालेल्या या लढतीत सिंधू विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या विश्वासाने कोर्टवर उतरली खरी, पण तिला निराश व्हावे लागले. ग्लास्गो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत कास्यपदक जिंकणा:या सिंधूला कॅरोलीनाकडून 47 मिनिटांत 17-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. सिंधू आधीच्या दोन फे:यांमध्ये युन जू बेई आणि चीनची शिजीयान वाँगला पराभूत करताना जो जोश व आक्रमता तिच्यात होती ती उपांत्य लढतीत कॅरोलीनविरुद्ध लढताना दिसून आली नाही. कॅरोलीनाने आज सिंधूविरुद्ध लढताना जलद रॅलीजचा खेळ केला. तिने नेटजवळ काही उत्कृष्ट प्लेसिंगसुद्धा करून सिंधूला हैरान केले.कॅरोलीनाची अंतिम फेरीत चीनची ली शुरुईविरुद्ध लढत होईल. (वृत्तसंस्था)
ली चोंग अंतिम फेरीत
4पुरुषांच्या एकेरीत जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मलेशियाचा ली चोंग वेई सलग तिस:यांदा विश्वचषक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. महिला गटात अग्रमानांकित चीनची ली शुरुई हिनेही अजिंक्यपदाच्या लढतीत जागा मिळविली आहे.
4दोन वेळेचा विजेता आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता ली चोंग याने अव्वल मानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेन याला 21-9, 21-7 असे हरविले. आता त्याची लढत चीनच्या चेन लोंग आणि इंडोनेशियाच्या टामी सुगियार्तो यांच्यातील लढतीतील विजेत्याशी होणार आहे.