पुण्याचे पारडे जड
By Admin | Updated: April 17, 2016 03:36 IST2016-04-17T03:36:23+5:302016-04-17T03:36:23+5:30
रायझिंग पुणे सुपर जायंट्स तिसऱ्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबशी मोहालीत लढत देत आहे. पुण्याकडे तगडे खेळाडू असले, तरी त्यात योग्य संतुलन राखण्याचे कसब कर्णधार

पुण्याचे पारडे जड
मोहाली : रायझिंग पुणे सुपर जायंट्स तिसऱ्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबशी मोहालीत लढत देत आहे. पुण्याकडे तगडे खेळाडू असले, तरी त्यात योग्य संतुलन राखण्याचे कसब कर्णधार महेंद्रसिंह धोनीला करावे लागले. तर दुसरीकडे सलग दोन पराभवानंतर घरच्या मैदानावर होत असलेल्या सामन्याचा फायदा उठवित विजयाचे खाते उघडण्यासाठी पंजाब प्रयत्नशील राहील.
आयपीएलच्या पदार्पणातच सुपरजायंट्सने चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे. तगडी स्टारकास्ट असल्याने साहजिकच संघ मजबूत मानला जात आहे. गेल्या दोन सामन्यांत एक विजय व एक पराभव, असे पुण्याच्या पारड्यात आहे, तर दोन्ही सामने गमावणारा पंजाब गुणतालिकेत तळाच्या स्थानी आहे.
स्पर्धेची ही सुरुवात असल्याने अजूनही प्रत्येक संघाला गुणतालिकेत अव्वल राहण्याची संधी आहे. धोनीचा आर. पी. सिंह याच्यावर विश्वास असला, तरी गेल्या काही काळात तो आपल्यावरील विश्वास सार्थ करण्यात अपयशी ठरला आहे. ईशांत शर्माच्या कामगिरीतदेखील सातत्य नाही. इरफान पठाण व ईश्वर पांडे यांच्या रूपाने धोनीकडे पर्याय आहेत; मात्र इरफान गोलंदाजीत चमक दाखवू शकलेला नाही; मात्र त्याच्याकडे फलंदाजीचे अंग असल्याने अष्टपैलू खेळाडू म्हणून धोनीची त्याला पसंती मिळू शकते.
उभय संघ यातून निवडणार
रायझिंग पुणे सुपरजायंट्स : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, केविन पीटरसन, फाफ डु प्लेसिस, स्टीव स्मिथ, मिशेल मार्श, जसकरण सिंह, रविचंद्रन आश्विन, अंकित शर्मा, एल्बी मोर्कल, इरफान पठान, इशांत शर्मा, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, सौरभ तिवारी, आरपी सिंह, रजत भाटिया, अंकुश ब्यांस, बाबा अपराजित, मुरुगन आश्विन, अशोक डिंडा, दीपक चाहर, स्काट बोलैंड, पीटर हँडस्कॉब, अॅडम झम्पा.
किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), काइल अॅबोट, मुरली विजय, मनन व्होरा, मिचेल जॉन्सन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, अनुरितसिंग, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा, प्रदीप साहू, संदीप शर्मा, मोहित शर्मा, मार्क्स स्टोइनिस, स्वप्निल सिंग, अरमान जफर, फरहान बेहरदिन, के. सी. करीअप्पा, ऋषी धवन, गुरकीरतसिंग मान, निखिल नाईक, शार्दूल ठाकूर.