पंजाबचा दणदणीत विजय !
By Admin | Updated: September 27, 2014 02:34 IST2014-09-27T02:34:36+5:302014-09-27T02:34:36+5:30
बॅट आणि चेंडू यांच्यात ताळमेळ बसवण्यात गेल्या वर्षभरापासून अपयशी ठरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या वीरेंद्र सेहवागला शुक्रवारी अखेर नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट विरुद्ध लय सापडली

पंजाबचा दणदणीत विजय !
मोहाली : बॅट आणि चेंडू यांच्यात ताळमेळ बसवण्यात गेल्या वर्षभरापासून अपयशी ठरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या वीरेंद्र सेहवागला शुक्रवारी अखेर नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट विरुद्ध लय सापडली. सेहवाग, मनन व्होरा, डेवीड मिलर यांच्या धमाकेदार कामगिरीनंतर पंजाबच्या गोलंदाजांची टिच्चून मारा करून नॉर्दर्नचा डाव ९५ धावांत गुंडाळला. २१५ धावांच्या आव्हानासमोर नॉर्दर्नने नांगी टाकली आणि पंजाबने १२० धावांनी दणदणीत विजय साजरा केला.
वीरेंद्र सेहवागने अर्धशतकी खेळी करून मनन व्होरासह शतकी धावांची सलामी देऊन पंजाबला दमदार सुरुवात करून दिली. नाणेफेक जिंकून नॉर्दर्न संघाने पंजाबला फलंदाजीला आमंत्रित केले. सेहवाग व वोहरा यांच्या अर्धशतकांनंतर मिलरच्या ताबडतोड ४० धावांच्या बळावर पंजाबने निर्धारित २० षटकांत ५ बाद २१५ धावांचा डोंगर उभा केला.
या आव्हानाचा पाठलाग करताना नॉर्दर्नचे केन विलियम्सन (२०), अँटोन डेवसिक (२८) आणि डॅनिएल फ्लॅनी (१२) हे फलंदाज वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. नॉर्दर्नचा डाव १५.२ षटकांत अवघ्या ९५ धावांत गडगडला. (वृत्तसंस्था)