शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

आक्रमक खेळ करण्याची पंजाबची रणनीती

By admin | Updated: September 17, 2014 23:06 IST

आयपीएलच्या सातव्या पर्वातील उपविजेता किंग्स इलेव्हन पंजाबला चॅम्पियन्स लीग टी-2क् च्या सलामीला गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या होबर्ट हरिकेन संघाचे आव्हान असेल.

मोहाली : आयपीएलच्या सातव्या पर्वातील उपविजेता किंग्स इलेव्हन पंजाबला चॅम्पियन्स लीग टी-2क् च्या सलामीला गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या होबर्ट हरिकेन संघाचे आव्हान असेल. ‘ब’ गटाच्या या लढतीत आक्रमक खेळाच्या बळावर विजय मिळविण्याचे डावपेच पंजाबने आखले आहेत.
किंग्स पंजाब प्रथमच चॅम्पियन्स लीगमध्ये खेळतो आहे. जॉर्ज बेली याच्या नेतृत्वाखालील या संघाची भिस्त स्वत: बेलीसह ग्लेन मॅक्सवेल आणि मिशेल जॉन्सन यांच्यावर असेल. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू संजय बांगर याच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या या संघाकडे वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा, मनन वोहरा हे आक्रमक फलंदाज आहेत. गोलंदाजीची धार मात्र कमी झालेली दिसते कारण क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून अद्याप मंजूरी मिळाली नसल्याने जॉन्सनच्या खेळण्याविषयी संभ्रम आहे. जॉन्सनशिवाय गोलंदाजीसाठी अक्षर पटेल, लक्ष्मी पती बालाजी आणि लंकेचा तिसारा परेरा यांचा पर्याय उपलब्ध आहे. 
आयपीएल-7 मध्ये 14 सामन्यात 17 बळी घेणा:या जॉन्सनबाबत बांगर म्हणाला,‘ आम्ही जॉन्सनला मंजूरी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहोत. मंजूरी मिळाली नाही तरी आमच्या संघात जबाबदारी ओळखून खेळणारे अनेक खेळाडू आहे. जॉन्सन खेळणार असेल तर उत्तम पण तो खेळला नाहीच तर अन्य पर्याय उपलब्ध आहेत.’
होबर्ट हरिकेन्सला देखील आपल्या खेळाडूंकडून ब:याच आशा आहेत. हरिकेन्सचे कोच डेमियन राईट म्हणाले,‘ आम्ही पहिल्यांदा क्लब आणि संघ म्हणून चॅम्पियन्स लीग खेळण्यास उत्सुक आहोत. आयपीएलचा अनुभव असलेले आमच्या संघात बरेच खेळाडू आहेत.’ टिम पेन याच्या नेतृत्वाखालील हरिकेन्स संघात डग बोलिजंर, बेन हिल्फेन्हास, पाकचा माजी कर्णधार शोएब मलिक आणि ङोव्हियर डोहर्टी आदींचा समावेश आहे.(वृत्तसंस्था) 
 
जखमी जॉन्सनची माघार !
मेलबोर्न: वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याच्या छातीला मार लागल्याने तो चॅम्पियन्स लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळणार नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी स्पष्ट केले. ङिाम्बाब्वेविरुद्ध वन डे दरम्यान जॉन्सनच्या पासळीला मार लागला होता. त्याने गोलंदाजीतून ब्रेक घेतला असून जखमेवर उपचार सुरू आहेत. तो पूर्णपणो तंदुरुस्त झाला नसून पुढील आठवडय़ात फिटनेस चाचणी घेतली जाईल. वैद्यकीय सल्ल्यामुळे  जॉन्सनला पंजाबकडून खेळण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचे सीएचे महाव्यवस्थापक पॅट हॉवर्ड यांनी सांगितले.