पंजाबचे कोलकाताला १३९ धावांचे आव्हान
By Admin | Updated: April 19, 2016 22:41 IST2016-04-19T21:38:24+5:302016-04-19T22:41:47+5:30
आयपीएलच्या नवव्या पर्वातील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाइट रायडर्ससमोर १३९ धावांचे लक्ष ठेवले आहे. या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकात आठ बाद

पंजाबचे कोलकाताला १३९ धावांचे आव्हान
>
ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. १९ - आयपीएलच्या नवव्या पर्वातील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाइट रायडर्ससमोर १३९ धावांचे लक्ष ठेवले आहे. या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकात आठ बाद १३८ धावा केला. फलंदाज शॉन मार्शने संघाला सावरण्याचा प्रयत्न करत नाबाद ५६ धावा केल्या.
किंग्ज इलेव्हन पंजाबला म्हणावी तशी फलंदाजी या सामन्यात करता आली नाही. पंजाब संघाची मधली फळी लवकर तंबूत परतली. काईल अॅबोट नाबाद १२ धावा केल्या, तर मुरली विजय या सामन्यात २६ धावा काढून बाद झाला. मनन व्होरा (८), वृद्धिमान साहा (८), मिलेर (६), ग्लेन मॅक्सवेल (४), अक्षर पटेल (९), मोहित शर्मा आणि प्रदीप साहू अवघ्या एक धावा काढून बाद झाले.
कोलकाता नाइट रायडर्सकडून गोलंदाज सुनील नारायण आणि मोर्ने मॉर्केल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर युसूफ पठाण, उमेश यादव आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक बऴी घेतले.