सात विकेट राखून पंजाबचा विजय
By Admin | Updated: September 29, 2014 06:33 IST2014-09-29T06:33:20+5:302014-09-29T06:33:20+5:30
चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेच्या रविवारी झालेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने सात विकेट राखून केप कोबरावर विजय साजरा केला

सात विकेट राखून पंजाबचा विजय
मोहाली : चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेच्या रविवारी झालेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने सात विकेट राखून केप कोबरावर विजय साजरा केला. विरेंद्र सेहवाग, मनन वोहरा, वृद्धिमान सहा आणि ग्लेन मॅक्सवेल या चौकडीने १३५ धावांचे लक्ष्य सहज पार करून विजय मिळवला.
रिचर्ड लेवी आणि हाशिम आमला हे वगळता कोबराच्या इतर फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांसमोर लोंटांगण घातले. अनुरीत सिंह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत कोबराचा डाव १८.३ षटकांत १३५ धावांतच गुंडाळला. परविंदर अवाना, परेरा, करनवीर सिंह आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या उत्तरात उतरलेल्या पंजाबने १८.१ षटकांत अवघ्या ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १३९ धावा करून विजय निश्चित केला.
संक्षित्प धावफलक : केप कोबरा - सर्वबाद १३५ धावा (लेवी ४२, आमला ४०; अनुरीत ३-१२, पटेल ३-१५) पराभूत वि. पंजाब - ३ बाद १३९ धावा (सेहवाग २३, वोहरा २३, सहा ४२, मॅक्सवेल २३)