मुंबईसमोर विजयासाठी पंजाबने ठेवले 231 धावांचे आव्हान
By Admin | Updated: May 11, 2017 22:10 IST2017-05-11T22:09:24+5:302017-05-11T22:10:40+5:30
आयपीएल 10च्या पर्वात आज मुंबईत झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबनं मुंबईसमोर विजयासाठी 231 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे

मुंबईसमोर विजयासाठी पंजाबने ठेवले 231 धावांचे आव्हान
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - आयपीएल 10च्या पर्वात आज मुंबईत झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबनं मुंबईसमोर विजयासाठी 231 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पंजाबनं उत्कृष्ट फलंदाजीचा नजराणा पेश करत 3 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 20 षटकांत 230 धावांचा डोंगर उभा केला आहे. एकट्या सहानं शानदार नाबाद खेळीच्या जोरावर 55 चेंडूंत 11 चौकार आणि 3 षटकार लगावत अर्धशतक पार करत 93 धावांची खेळी केली आहे. तर मॅक्सवेलनंही 21 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकार खेचत 47 धावा केल्या आहेत. मात्र बुमराहच्या गोलंदाजीसमोर मॅक्सवेलचा निभाव लागला नाही आणि तो तंबूत परतला. या सामन्यात गुप्टिल आणि सहानं सर्वाधिक 68 धावांची भागीदारी केली आहे. तर गुप्टिल 36, मार्श 25 आणि पटेल नाबाद 19 धावा केल्या आहेत.