शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सिंग इज किंग! कांस्य पदकासह हॉकी संघातील खेळाडू पोहचले सुवर्ण मंदिरात (Video)

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 11:38 IST

हॉकीतील ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडूंचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. इथं पाहा तो खास व्हिडिओ

'सिटी ऑफ लव्ह' पॅरिसमधून मायदेशी परतलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसतो आहे. भारतात आल्यानंतर भारतीय हॉकी संघातील सदस्यांचे अगदी धमाक्यात स्वागत करण्यात आले. त्यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडूंचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात संघातील खेळाडूंनी पंजाब येथील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात प्रार्थना केल्याचे दिसून येते.  

आधी जंगी स्वागत; आता कांस्य पदकासह  प्रार्थनेसाठी सुवर्ण मंदिरात पोहचले हॉकी चॅम्पियन 

जगातील मानाची स्पर्धा समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं देशासाठी सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा पुरुष हॉकी संघाने आपली छाप सोडली आहे. सलग टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाने कांस्य पदक जिंकून इतिहास रचला. ऐतिहासिक कामगिरीनंतर संघातील खेळाडूंचे जंगी स्वागत झाले. त्यानंतर संघातील खेळाडूंनी देशातील प्रसिद्ध सुवर्ण मंदीरात जाऊन प्रार्थना केल्याचे पाहायला मिळाले. भारतीय हॉकी संघानं ५२ वर्षापूर्वीची पुनरावृत्ती करत रचला इतिहास

 ५२ वर्षांनी पहिल्यांदा भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदकं जिंकली आहेत.ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताने हॉकीमध्ये एक विशेष कामगिरी नोंदवली आहे. सर्वाधिक 8 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकाची कमाई भारतीय संघाने या क्रीडा प्रकारात केली आहे. टोकिया आणि पॅरिस याआधी १९६८ आणि १९५२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकीने सलग दोन पदकांची कमाई केली होती.     लवकरच संपेल 'सुवर्ण दिना'ची देखील प्रतिक्षाही  

1980 मध्ये मास्को येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरीनंतर 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंत भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये संघर्ष करताना दिसला. पण आता सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पियन चॅम्पियन होत, भारतीय हॉकी संघाने पुन्हा 'सुवर्ण दिन' येतील या आशा वाढवल्या आहेत.    

टॅग्स :Hockeyहॉकीparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Team Indiaभारतीय क्रिकेट संघ