पंजाबवर मात करीत हिमाचल उपांत्य फेरीत
By Admin | Updated: December 23, 2015 23:38 IST2015-12-23T23:38:57+5:302015-12-23T23:38:57+5:30
रॉबीन बिष्टच्या (१०९) शतकाच्या जोरावर हिमाचल प्रदेशने बलाढ्य पंजाबवर मात करीत विजय हजारे चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पंजाबवर मात करीत हिमाचल उपांत्य फेरीत
बंगलोर : रॉबीन बिष्टच्या (१०९) शतकाच्या जोरावर हिमाचल प्रदेशने बलाढ्य पंजाबवर मात करीत विजय हजारे चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. बुधवारी झालेल्या या सामन्यात हिमाचलने पंजाबला पाच विकेटने पराभूत केले.
हिमाचलचा कर्णधार विपुल शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने ५० षटकांत आठ बाद २६३ धावा केल्या. पंजाबच्या मनदीप सिंगने १४५ चेंडूंत नऊ चौकार व एका षट्काराच्या साह्याने ११९ धावांची खेळी केली. भारतीय टी-२० संघात परतलेल्या युवराज सिंगला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. तो पाच धावा करून बाद झाला.(वृत्तसंस्था)