शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

पुण्याची खेळपट्टी खराब नव्हती

By admin | Updated: March 2, 2017 04:50 IST

पुण्याची खेळपट्टी खराब नव्हती, तर ही खेळपट्टी पहिल्या चेंडूपासूनच आव्हानात्मक होती

बंगळुरु : पुण्याची खेळपट्टी खराब नव्हती, तर ही खेळपट्टी पहिल्या चेंडूपासूनच आव्हानात्मक होती,’ असे वक्तव्य भारताचा सलामीवीर मुरली विजयने केले. पुण्याची खेळपट्टी खराब असल्याचा निर्णय आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी दिला होता. परंतु, ब्रॉड यांच्या निर्णयाशी असहमती दर्शविताना विजयने या खेळपट्टीला आव्हानात्मक म्हटले आहे.शनिवारपासून सुरू होणाऱ्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयने म्हटले की, ‘पुण्याची खेळपट्टी आव्हानात्मक होती. एक क्रिकेटपटू म्हणून आम्हाला सपाट खेळपट्टीवर खेळण्याऐवजी कधीतरी अशा खेळपट्टीवरही खेळले गेले पाहिजे. खरं म्हणजे, अशा खेळपट्टीवर खेळणे कधीही चांगले असते. अशा ठिकाणी आपला खेळ आणि तंत्र यांची परीक्षा होते.’ त्याचवेळी विजयला चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या सामन्यातील खेळपट्टी चांगली असेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, वैयक्तिकरीत्या तो खेळपट्टीविषयी चिंतीत नाही. विजय म्हणाला, ‘मी मोकळेपणाने मैदानावर उतरतो आणि खेळपट्टीनुसार स्वत:च्या खेळामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो. माझं वैयक्तिक मत आहे, की भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात मोठ्या धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन करणे कठीण होते. एकूणच आम्ही चांगला खेळ केला नाही.’डीआरएसच्या वापाराविषयी विजयने सांगितले, ‘नक्कीच डीआरएसचा पर्याय आमच्यासाठी अनुकूल राहिला नाही. माझ्या मते आम्हाला त्या १५ सेकंदाचा चांगला उपयोग केला पाहिजे. पुण्यातील पराभवानंतर आम्ही चर्चा केली आणि आम्ही काही कमजोर ठरलेल्या बाजूंवर काम सुरू केले आहे. आम्ही नव्याने सुरुवात करून सर्व संधींचा फायदा उचलण्यास सज्ज आहोत.’ (वृत्तसंस्था) >या मालिकेची सुरुवात २०१५ च्या श्रीलंका दौऱ्यासारखी आहे. आम्ही सध्या आमच्या खेळाविषयी विचार करीत आहोत आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात सकारात्मक विचाराने खेळण्याचा आमचा निर्धार आहे. एक संघ म्हणून पुण्यात आम्ही अपयशी ठरलो. आम्हाला या गोष्टीचा स्वीकार करून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. - मुरली विजय