पुणेगाव, आळंदी, भोजापूर, भावली, हरणबारी ओव्हरफ्लो

By Admin | Updated: August 2, 2016 23:09 IST2016-08-02T23:09:31+5:302016-08-02T23:09:31+5:30

पुणेगाव, आळंदी, भोजापूर, भावली, हरणबारी ओव्हरफ्लो

Punegaon, Alandi, Bhojapur, Bhavali, Hernabari Overflow | पुणेगाव, आळंदी, भोजापूर, भावली, हरणबारी ओव्हरफ्लो

पुणेगाव, आळंदी, भोजापूर, भावली, हरणबारी ओव्हरफ्लो

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पुणेगाव धरणाच्या तीन मोऱ्यांमधून तासी चार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपासून दमदार पावसाला सुरुवात झाली असून, रात्रीच्या वेळी सप्तशृंगगड, अहिवंतवाडी, चामदरी, गोलदरी, चंडिकापूर, जिरवाडे, अंबानेर, पांडाणे, पुणेगाव, अस्वलीपाडा, पिंपरी, कोल्हेर, दगडपिंप्री, हस्तेदुमाला या भागात धो धो पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर देवनदीला पूर आला आहे. पुणेगाव धरण पूर्ण भरल्याने सकाळी ७ वाजेपासून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली होती. देवनदीच्या पुराचे पाणी शेतीत शिरल्याने पांडाणे येथील बाकेराव खंडेराव कड यांचे टमाट्याला केलेले ठिंबक व बांबू वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. (वार्ताहर)

Web Title: Punegaon, Alandi, Bhojapur, Bhavali, Hernabari Overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.