पुण्यातील खेळपट्टी खराब, सामनाधिकाऱ्यांचे ताशेरे

By Admin | Updated: February 28, 2017 19:53 IST2017-02-28T17:02:23+5:302017-02-28T19:53:10+5:30

फिरकीला अनुकूल ठरलेल्या पुण्यातील आखाडा खेळपट्टीवर फलंदाजी करताना फलंदाजांची त्रेधा उडाली होती. आता ही खेळपट्टी वादात सापडली असून, सामनाधिकाऱ्यांनी

Pune pitches bad | पुण्यातील खेळपट्टी खराब, सामनाधिकाऱ्यांचे ताशेरे

पुण्यातील खेळपट्टी खराब, सामनाधिकाऱ्यांचे ताशेरे

ऑनलाइन लोकमत 
दुबई, दि.28 - नुकत्याच आटोपलेल्या पुणे कसोटीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्करावा लागला. फिरकीला अनुकूल ठरलेल्या या आखाडा खेळपट्टीवर फलंदाजी करताना फलंदाजांची त्रेधा उडाली होती. आता ही खेळपट्टी वादात सापडली असून, सामनाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानातील ही खेळपट्टी  खराब असल्याचा अहवाल आयसीसीला दिला आहे. 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी ख्रिस ब्रॉड यांनी सामनाधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यांनी या खेळपट्टीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयसीसीला पाठवलेल्या आपल्या अहवालात खेळपट्टीवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. या अहवालाची दखल घेत 14 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश आयसीसीने बीसीसीआयला दिले आहेत.
 प्रथमच कसोटी सामन्याचे आयोजन करत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची खेळपट्टी मात्र  कसोटी क्रिकेटला साजेशी नव्हती. या खेळपट्टीवर एकीकडे पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने दोन्ही डावात अडीचशेपार मजल मारण्यात यश मिळवले. पण यजमान संघाची मात्र घरच्या मैदानावर दाणादाण उडाली. एकाही फलंदाजाला चमकदार कामगिरी करता न आल्याने दोन्ही डावात शंभरी गाठताना भारतीय संघाच्या नाकी नऊ आले होते.    

Web Title: Pune pitches bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.