पुणे दुखापतीमुळे झाले ‘उणे’

By Admin | Updated: May 2, 2016 22:33 IST2016-05-02T22:33:23+5:302016-05-02T22:33:23+5:30

यंदाच्या मोसमातून आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या राइजिंग पुणे सुपरजायंट्सची निराशाजनक कामगिरी सुरु असतानाच त्यांना प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींचाही मोठा फटका बसला आहे.

Pune injured due to injury | पुणे दुखापतीमुळे झाले ‘उणे’

पुणे दुखापतीमुळे झाले ‘उणे’

स्टिव्ह स्मिथही जायबंदी : मायदेशी परतला
मेलबोर्न : यंदाच्या मोसमातून आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या राइजिंग पुणे सुपरजायंट्सची निराशाजनक कामगिरी सुरु असतानाच त्यांना प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींचाही मोठा फटका बसला आहे. धडाकेबाज फाफ डू पेल्सिस, केविन पीटरसन आणि अष्टपैलू मिशेल मार्श दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर आता आॅस्टे्रलियाचा भरवाशाचा आणि सुपराजायंट्सच्या फलंदाजीचा आधारस्तंभ असलेला स्टिव्ह स्मिथही मनगटाच्या दुखापतीमुळे मायदेशी रवाना झाला आहे. एकूण चार प्रमुख खेळाडू एकाचवेळी जायबंदी झाल्याने पुणेकर एकाकी दुबळे भासू लागले आहेत.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळत असलेल्या या संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत आपल्या आठ सामन्यांतून सहा सामने गमावले असून केवळ दोन सामने जिंकले आहेत. मात्र, प्रमुख खेळाडूंच्या दुखापती ही सध्या पुणे संघासाठी सर्वात चिंतेची बाब आहे. पीटरसन, प्लेसिस आणि मार्श यांच्यानंतर स्मिथही दुखापतग्रस्त झाल्याने उर्वरीत आयपीएल सामन्यात तो खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आधीच पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पुणेकरांसमोर विजयी मार्गावर येण्याचे खडतर आव्हान असेल.
आॅस्टे्रलियाचे स्पोटर््स सायन्स मॅनेजर अ‍ॅलेक्स काऊंटूरिस यांनी सांगितले की, ‘‘स्टिव्हच्या उजव्या मनगटाता गेल्या आठवड्यात दुखापत झाली होती. आम्ही आयपीएलमध्ये पुणे संघासह त्याच्या दुखापतीसंबंधी संपर्कात होतो आणि दुर्देवाने त्याची दुखापती ठिक होऊ शकली नाही. त्यामुळे तो लवकर मायदेशी परतत असून ज्याद्वारे वेस्ट इंडिज दौऱ्यापुर्वी त्याच्या दुखापतीचे योग्य पध्दतीने परिक्षण करता येईल.’’
‘‘सध्या मिळालेल्या माहितीनुसार स्टिव्हची दुखापत गंभीर आहे. त्यामुळे त्याला यातून सावरण्यासाठी आम्हाला अधिक वेळ देणे गरजेचे आहे. त्याला अधिक वेळ मिळाल्यास विंडिज दौऱ्यासाठी तो उपलब्ध असेल. स्टिव्हने दुखापत असतानाही आयपीएलमध्ये आपल्या पुणे संघासाठी एकही सामना सोडला नाही आणि अन्य बलाढ्य खेळाडूंच्या अनुपस्थित मैदानात उतरताना एक शतकही ठोकले,’’ असेही अ‍ॅलेक्स यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे संघात आता मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून पीटरसन व प्लेसिसच्या जागेवर निवड झालेला आॅस्टे्रलियाचा आक्रमक सलामीवीर उस्मान ख्वाजाला संधी मिळू शकते. त्याचवेळी मार्शच्या जागी नवीन खेळाडू म्हणून अद्याप कोणाचे नाव पुढे आलेले नाही. (वृत्तसंस्था)



 

Web Title: Pune injured due to injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.