शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची ‘डॉल्फिन गर्ल’ कॅमिला; स्पेशल ऑलिम्पिकमध्ये जिंकली 2 पदकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 16:50 IST

विशेष ऑलिम्पिकमध्ये पुण्याची ‘डॉल्फिन गर्ल’ कॅमिला पटनायकने जलतरणात शानदार कामगिरी केली.

पुणे : विशेष ऑलिम्पिकमध्ये पुण्याची ‘डॉल्फिन गर्ल’ कॅमिला पटनायकने जलतरणात शानदार कामगिरी करीत भारताला २ पदके जिंकून दिली. १८ वर्षीय कॅमिला शुक्रवारी पुण्यात परतल्यावर तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे नुकतीच १४ ते २१ तारखेदरम्यान ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत कॅमिलाने ८०० मीटर पूल स्विमिंग प्रकारात रौप्य तर, १५०० मीटर सागरी जलतरण प्रकारात कांस्यपदक जिंकले. याशिवाय विशेष ऑलिम्पिकच्या काळातच तेथे सुपर स्पोर्ट्स इंटरनॅशनल ही स्पर्धा झाली. यात सर्व वयोगटातील सामान्य तसेच विशेष खेळाडू सहभागी झाले होते. यातील सागरी जलतरण प्रकारात १५०० मीटरची शर्यतही कॅ मिलाने पूर्ण केली.

पिंपळे गुरव परिसरातील कल्पतरू सोसायटी या निवासस्थानी परतताच कॅ मिलाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सोसायटी तसेच परिसरातील नागरिकांनी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिचे कौतुक केले. कॅमिलाचे वडील सूर्यनारायण, आई लीला आणि लहान बहिण भव्या तिच्यासोबत गेले होते. विशेष मुलांच्या वर्तनाचा अभ्यास असल्याने सूर्यनारायण आणि लीला या दाम्पत्याने विशेष ऑलिम्पिकमध्ये स्वयंसेवकाची भूमिका बजावली. या योदानासाठी विशेष सत्कार करण्यात आलेल्या निवडक लोकांमध्ये त्यांचा सहभाग होता. 

शिवाय ११ वर्षीय भव्याने सुपर स्पोर्ट्स इंटरनॅशनलमध्ये समुद्री जलतरणाच्या २०० मीटर शर्यतीत कांस्यपदक प्राप्त केले. पटनायक कुटुंबातील या सर्वांच्या यशाचे कल्पतरू सोसायटीतील सदस्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले. ५२ वर्षीय सूर्यनारायण टाटा मोटर्समध्ये इंजिनिअरिंग रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत आहेत. लीला या मुलींची संपूर्ण देखभाल करतात. 

वयाच्या १३ व्या वर्षापासून सरावकॅमिलाने वयाच्या १३व्या वर्षापासून पोहण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून अभिजित तांबे यांच्याकडे ती सराव करीत आहे. पिंपरी येथील अण्णासोहब मगर स्टेडियममध्ये रोज ३ ते ४ तास सराव हा तिच्या यशाला कारणीभूत ठरला. २०१५ मध्ये कॅ मिलाने ५ किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत सामान्य खेळाडूंना मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला होता. तेव्हा तिला तांबे यांनी ‘डॉल्फिन गर्ल’ म्हणून संबोधले होते. कॅमिलाची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. यापूर्वी २०१६ मध्ये इटलीतील स्पर्धेतील ती सहभागी झाली होती. शिवाय, राष्ट्रीय स्तरावर तिने ७ सुवर्णपदके जिंकली आहेत.

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गायचे होते...कॅमिलाला गायनाची आवड आहे. तिला देशभक्तीपर गाणी जास्त आवडतात. त्यापैकी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणे तिचे विशेष आवडते. हे गाणे स्पर्धेदरम्यान गायची तिची इच्छा होती. पण ती पूर्ण झाली नाही. आगामी काळात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपले आवडते गाणे तेथे गाणार असल्याचे कॅमिलाने ‘लोकमत’ला सांगितले. स्पर्धेबाबत बोलताना ती म्हणाली, ‘‘आम्ही तेथे खूप मजा केली. अनेक नवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्या. पुन्हा ऑलिम्पिकमध्ये खेळायला मला आवडेल.’’

भीक मागणाऱ्या मुलांसाठी काम करण्याची इच्छारस्त्यांवर भीक मागणाऱ्या मुलांबाबत कॅमिलाला सहानुभूती आहे. अशी मुले दिसली की ती वडिलांना मागून त्यांना पैसे देते. या मुलांसाठी काम करायची तिची इच्छा असल्याने कॅमिलाच्या वडिलांनी सांगितले.

अनपेक्षित यश...कॅमिला ही इतक्या मोठ्या स्पर्धेत २ पदके जिंकेल, याचा विचार आम्ही अजिबातही केला नव्हता. मात्र, प्रशिक्षक अभिजित तांबे यांचा तिच्या क्षमतेवर विश्वास होता. तिच्यात ऑलिम्पिक पदक जिंकण्याची क्षमता आहे, असे ते कायम म्हणायचे. या यशाचे श्रेय त्यांना जाते.- लीला पटनायक, कॅमिलाची आई

मुलीचा अभिमानवडील म्हणून मुलीने जागतिक स्तरावर मिळविलेल्या यशाचा मला खूप अभिमान वाटतो. तिच्या आनंदासाठी वाट्टेल ते करण्याची माझी तयारी आहे.- सूर्यनारायण पटनायक, कॅमिलाचे वडील

टॅग्स :PuneपुणेSwimmingपोहणे