शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

टोकियोत चांगली कामगिरी भारतासाठी आनंददायी ठरेल: पुलेला गोपीचंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 08:26 IST

असंख्य आव्हाने पेलण्यास आमचे खेळाडू सज्ज आहेत.

टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीदरम्यान भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास संचारला. त्यांच्यात आत्मविश्वासासह उत्कंठा देखील पहायला मिळते. कोरोनाच्या सावटातही त्यांची तयारी थांबलेली नाही. असंख्य आव्हाने पेलण्यास आमचे खेळाडू सज्ज आहेत. वर्षभर खेळ लांबणीवर पडले पण आमच्या खेळाडूंचा उत्साह मुळीच कमी झालेला नाही. त्यांनी उत्कृष्ट शारीरिक, भावनिक आणि प्रतिस्पर्धी तयारीत कुठलीही कसर शिल्लक राखली नाही.

ज्या बॅडमिंटनपटूंना पात्रता गाठण्यात यश आले त्यांना आवश्यक पाठिंबा देखील लाभला आहे. प्रत्येकाला परदेशी प्रशिक्षकाचे मार्गदर्शन मिळाले. सोबतीला फिजियो आणि कंडिशनिंग कोच आहेच. आधी या गोष्टींवर लक्ष नसायचे. त्यामुळे पराभवानंतर खेळाडूंची निराशा बाहेर यायची. २०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये देशाला अपेक्षित निकाल मिळाला नव्हता. पंतप्रधानांनी नेमलेल्या टार्स्क फोर्समध्ये माझीही नेमणूक झाली. तेव्हापासून पायाभूत सुविधांसह देशभरात सर्वदूर टॅलेंटचा शोध घेण्यात आला. त्यामुळे सकारात्मक आणि दिलासादायी चित्र निर्माण झाले. खेळात व्यावसायिक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. देशाने ‘ॲथ्लिट फर्स्ट’या उल्लेखनीय बदलाचा स्वीकार केला. साईच्या माध्यमातून त्यांच्यासाठी सुविधांचा दर्जा वाढवला.

उल्लेखनीय बदल म्हणून, भारताने प्रथम अ‍ॅथ्लिट्सची नेमणूक केली आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यांच्या गरजा भागविल्या पाहिजेत. खेळाडूंच्या गरजा तातडीने पूर्ण करण्यात आल्या. खेळाडूंना आर्थिक साहाय्य गरजेनुसार पुरविण्यात आले.राष्ट्रीय क्रीडा महासंघ तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सहकार्याने काम करताना क्रीडा मंत्रालयाने प्रशिक्षकांच्या करारास मुदतवाढ दिली. देशात उत्कृष्टता केंद्रात राष्ट्रीय शिबिरांचे वारंवार आयोजन होऊ लागले.

टोकियो २०२० त या प्रयत्नांना फळ येईल अशी मी आशा बाळगतो.आम्ही आमच्या खेळाडूंवर लक्षणीय गुंतवणूक केल्यामुळे भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी हा मैलाचा दगड ठरू शकेल. यातून एक सकारात्मक लाभ होईल. खेळात करिअर करण्यास युवा खेळाडू पुढे येतील. भारताला खेळात उच्च स्थान निर्माण करता येईल. कोरोनामुळे पसरलेले निराशेचे वातावरण भारतीय खेळाडू स्वत:च्या कामगिरीमुळे दूर करतील. टोकियोतील पदक विजेती कामगिरी देशवासीयांसाठी आनंददायी ठरू शकेल.

(पुलेला गोपीचंद हे भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.) 

टॅग्स :Pullela Gopichandपुलेला गोपीचंदBadmintonBadmintonOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020