सिनिअर संघात पुनरागमन होईल : पुजारा

By Admin | Updated: July 2, 2015 03:12 IST2015-07-02T03:12:15+5:302015-07-02T03:12:15+5:30

गेल्या काही वर्षांत कमकुवत कामगिरीमुळे संघाबाहेर असलेला आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजारा हा राष्ट्रीय कसोटी संघात स्थान मिळविण्यास उत्सुक आहे.

Pujara will return to senior players | सिनिअर संघात पुनरागमन होईल : पुजारा

सिनिअर संघात पुनरागमन होईल : पुजारा

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत कमकुवत कामगिरीमुळे संघाबाहेर असलेला आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजारा हा राष्ट्रीय कसोटी संघात स्थान मिळविण्यास उत्सुक आहे. काही वेळेतच अंतिम एकादशमध्ये पुन्हा स्थान मिळेल, याबद्दल तो आशावादी दिसतो.
पुजारा हा केवळ भारतीय अ संघाचे कर्णधारपद मिळाल्यावर समाधानी नसून राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात काम करण्याबद्दल आनंदी आहे. राष्ट्रीय निवडकर्त्यांनी २२ जुलैपासून सुरू होत असलेल्या आॅस्ट्रेलिया अ दौऱ्यासाठी चार दिवसांच्या दोन सामन्यांसाठी भारतीय अ संघाची धुरा पुजाराकडे सोपविली. आतापर्यंत २७ कसोटी सामने खेळलेल्या पुजाराने देशासाठी अखेरची कसोटी डिसेंबर महिन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती.
तो म्हणाला, ‘मी नियमितपणे संघात होतो; पण काही सामने खेळू शकलो नाही. काही वेळेनंतर अंतिम एकादशमध्ये स्थान मिळेल. त्यासाठी मी कठोर मेहनत घेत आहे. खेळात सुधारणा केल्यास संधी मिळणार हे नक्की. माजी खेळाडूंकडूनही टिप्स घेत आहे. भारत अ संघाचा कोच या नात्याने द्रविडची ही पहिलीच मालिका असेल.
‘इंग्लंडमध्ये खेळण्याचा मला मोठा लाभ झाला,’ असे सांगून पुजारा पुढे म्हणाला, ‘मी इंग्लंडमध्ये खेळतानाच थंड हवामान आणि चेंडूची वळण घेण्याची प्रवृत्ती या दोन्ही बाबींशी स्वत:ला एकरूप करून घेतले. फलंदाजाला थंड हवामान हे आव्हान असते. एखादी लहान चूक तुमचा बळी घेऊ शकते’, असे पुजाराने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

पुजाराला द्रविडसोबत काम करण्यात आनंद येत आहे. याविषयी तो म्हणाला, ‘द्रविड शानदार मेंटर असल्याने मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यातही राहुल संघासोबत होता. एनसीएत मी द्रविडला खेळताना पाहिले आहे. खेळातील बारकावे द्रविडने मला समजावून सांगितले. यशासारखे अपयशही स्वीकारण्याची गरज आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी मी जितक्या धावा काढत होतो त्यावरून शतकही ठोकू शकतो याबद्दल खात्री पटली. त्यामुळेच धावा निघत नसल्याने निराशेत वाढ होत गेली. यॉर्करशायरसाठी कौंटी खेळून खेळात नवे तंत्र अवगत केले.’

Web Title: Pujara will return to senior players