अखेर पुजाराला संधी मिळणार

By Admin | Updated: August 26, 2015 04:25 IST2015-08-26T04:25:26+5:302015-08-26T04:25:26+5:30

सलामीवीर मुरली विजय आणि यष्टीरक्षक फलंदाज रिध्दीमान साहा हे दोघे दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्यामुळे २८ आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात

Pujara will finally get an opportunity | अखेर पुजाराला संधी मिळणार

अखेर पुजाराला संधी मिळणार

कोलंबो : सलामीवीर मुरली विजय आणि यष्टीरक्षक फलंदाज रिध्दीमान साहा हे दोघे दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्यामुळे २८ आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराला खेळण्याची संधी मिळणार आहे.
राहुल द्रवीडचा उत्तराधिकारी समजल्या जाणाऱ्या पुजाराने आपली शेवटची कसोटी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आॅस्ट्रेलियाविरुध्द खेळली होती. परंतु त्यानंतर सिडनी येथे झालेल्या चौथ्या कसोटीत त्याला वगळण्यात आले होते. त्यानंतर बांगलादेशविरुध्दच्या एकमेव कसोटीमध्येही त्याला संधी देण्यात आली नव्हती.
पुजाराला श्रीलंकेविरुध्दच्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीतही राखीव बेंचवर बसवून रोहीत
शर्माला पसंती देण्यात आली.
रोहीत पहिल्या कसोटीत फेल
गेला परंतु दुसऱ्या कसोटीत त्याने शानदार खेळाचे प्रदर्शन केले
त्यामुळे त्याची संघातील जागा मजबूत झाली. (वृत्तसंस्था)

Web Title: Pujara will finally get an opportunity