पुणे : रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केलेल्या महाराष्ट्रातील ७ खेळाडूंना महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेतर्फे (एमओए) प्रत्येकी १ लाख रूपये देऊन रविवारी गौरविण्यात आले.मार्केटयार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात एमओएची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यानंतर एमओएचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते ललिता बाबर (अॅथलेटिक्स), देवेंद्र वाल्मिकी (हॉकी), दत्तू भोकनळ (रोर्इंग), प्रार्थना ठोंबरे (टेनिस), अयोनिका पॉल आणि हिना सिद्धू (नेमबाजी) यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अॅथलिट कविता राऊत कार्यक्रमाला उपस्थित नव्हती. तिच्या भावाने हा निधी स्वीकारला. या वेळी एमओएचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे सदस्य नामदेव शिरगावकर, एमओएचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रल्हाद सावंत, अशोक पंडित, प्रदीप गंधे, खजिनदार अॅड. धनंजय भोसले, संयुक्त सचिव डॉ. प्रकाश तुळपुळे, महेश लोहार, महाराष्ट्र हॉकीचे सरचिटणीस मनोज भोरे यांच्यासह विविध राज्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या रिओ आॅलिम्पिकपटूंना ‘एमओए’कडून प्रत्येकी १ लाख प्रदान
By admin | Updated: October 24, 2016 04:59 IST