रशियात सर्व स्तरांतून बुद्धिबळाला प्रोत्साहन

By Admin | Updated: October 14, 2014 00:29 IST2014-10-14T00:29:44+5:302014-10-14T00:29:44+5:30

अनातोली कार्पोव्ह, गॅरी कास्पारोव्ह यांनी बुद्धिबळविश्वावर गाजवलेल्या वर्चस्वामुळे रशियात जणू बुद्धिबळाची क्रांतीच घडून आली.

Promotion of chess at all levels in Russia | रशियात सर्व स्तरांतून बुद्धिबळाला प्रोत्साहन

रशियात सर्व स्तरांतून बुद्धिबळाला प्रोत्साहन

अमोल मचाले - पुणो 
अनातोली कार्पोव्ह, गॅरी कास्पारोव्ह यांनी बुद्धिबळविश्वावर गाजवलेल्या वर्चस्वामुळे  रशियात जणू बुद्धिबळाची क्रांतीच घडून आली. येथे सर्व स्तरांतून या खेळाला प्रोत्साहन  मिळत असल्याने आधीच्या तुलनेत अलीकडील काळात रशियातून मोठय़ा प्रमाणात ग्रॅण्डमास्टर घडत आहेत, अशा शब्दांत जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेतील रशियाचे प्रशिक्षक फारुख अमोनातोव यांनी बुद्धिबळ विश्वात ‘रशियन टक्का’ वाढण्यामागील गुपित सांगितले.
स्वत: ग्रॅण्डमास्टर असलेले 36 वर्षीय अमोनातोव  ‘लोकमत’सोबत संवाद साधताना म्हणाले, ‘‘रशियन नागरिक बुद्धिबळावर मनापासून प्रेम करतात.. भारतीय क्रिकेटवर करतात ना, अगदी तसेच! तेथे शालेय स्तरापासून बुद्धिबळावर आधारित अभ्यासक्रम आहे. शिवाय आपल्या मुलांनी हा खेळ शिकावा, यासाठी पालक उत्सुक असतात. रशियन बुद्धिबळ संघटना या खेळाच्या विकासासाठी नवनवीन योजना राबवत असते. सरकार यासाठी सढळपणो आर्थिक मदतदेखील करते. बिगर सरकारी संस्थादेखील यात मागे नाहीत. यामुळे अलीकडील काळात रशियातील अनेक कमी वयाच्या खेळाडूंनी ग्रॅण्डमास्टरचा नॉर्म पूर्ण केला आहे.’’
‘‘तसे पाहता आमच्याकडे स्किईंग, स्केटिंग हे खेळदेखील प्रसिद्ध आहेत. रशियन समाजामध्ये आता बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून, परंपराच झाली आहे. समाज आणि सरकार या दोघांचेही पाठबळ लाभल्यावर हा खेळ मागे कसा राहणार? कोणत्याही खेळाच्या विकासासाठी आवश्यक असणारी संघटनात्मक बांधणी आमच्याकडे चांगली आहे. रशियातील ज्युनिअर स्तरावरील स्पर्धासाठीही सरकार पैसा पुरवते. आमच्याकडे सातत्याने बुद्धिबळ शिबिराचे आयोजन होत असते.. अकादमीही मोठय़ा प्रमाणावर कार्यरत आहेत. यामुळे 
येत्या काळात रशियाने बुद्धिबळविश्वावर वर्चस्व गाजवल्यास नवल वाटणार नाही,’’ असेही अमोनातोव यांनी नमूद केले.
 
4आधी कार्पोव्ह आणि नंतर कास्पारोव्ह या रशियनांनी 1975 ते 2क्क्क् या काळात बुद्धिबळ विश्वावर जणू एकछत्री अंमल गाजवला. यामुळे सामान्य रशियन नागरिकाचे या खेळाबाबत प्रेम वाढले. 
4त्याचाच परिणाम म्हणून पुरुष गटात व्लादिमीर क्रामानिकनंतर अलीकडे  अलेक्झांडर ग्रिस्चूक, सज्रेई काजर्कीन, दिमित्री जाकोवेन्को, पीटर स्वीडलर, निकीता वितीयूगोव्ह, तर महिलांत अलेक्झांड्रा कोस्तेनियूक, व्ॉलेंटिना गुनिना, कॅ टरेयाना लागनो हे खेळाडू ग्रॅण्डमास्टर म्हणून चमकदार कामगिरी करीत आहेत. 
4फिडेच्या मानांकन यादीत पुरुषांच्या टॉप ट¦ेंटीत 5 खेळाडू रशियन आहेत. महिलांमध्ये हे प्रमाण वीसमध्ये चार असे आहे. सध्या पुण्यात सुरू असलेल्या जागतिक ज्युनिअर स्पर्धेत खुल्या आणि मुलींच्या गटात अव्वल मानांकन आहे ते रशियनांनाच! खुल्या गटात 19 वर्षीय व्लादिमीर फेडोसीव, तर मुलींमध्ये 16 वर्षीय अलेक्झांड्रा गोर्याचकिना यांना अव्वल मानांकन आहे. या स्पर्धेत आमचे खेळाडू ठसा उमटवतील, असा विश्वास अमोनातोव यांनी व्यक्त केला.

 

Web Title: Promotion of chess at all levels in Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.