पहिली कसोटी अॅडिलेडमध्ये होण्याची शक्यता
By Admin | Updated: December 1, 2014 01:34 IST2014-12-01T01:25:00+5:302014-12-01T01:34:28+5:30
अॅडिलेड ह्युजचे गृहशहर आहे. ह्युजच्या अपघाती मृत्यूच्या धक्यातून सावरण्यासाठी उभय संघांना काही कालवधी मिळणार आहे.

पहिली कसोटी अॅडिलेडमध्ये होण्याची शक्यता
सिडनी : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पहिला कसोटी सामना ब्रिस्बेन ऐवजी अॅडिलेडमध्ये आयोजित होण्याची शक्यता आहे. अॅडिलेड ह्युजचे गृहशहर आहे. ह्युजच्या अपघाती मृत्यूच्या धक्यातून सावरण्यासाठी उभय संघांना काही कालवधी मिळणार आहे. ह्युजचा आज २६ वा जन्मदिवस आहे.
‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’च्या वृत्तानुसार चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत अॅडिलेडमध्ये होण्याची शक्यता आहे. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार अॅडिलेडमध्ये १२ ते १६ डिसेंबर या कालावधीत दुसरा कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता.
स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान बाऊंसरव दुखापग्रस्त झालेल्या ह्युजच्या पार्थिवावर अंतिम संस्कार न्यू साऊथ वेल्समधील मॅक्सविलेमध्ये त्याच्या जुन्या शाळेच्या ’स्पोर्ट््स हॉल’मध्ये बुधवारी होणार अहे. वृत्तानुसार पूर्वघोषित कार्यक्रमाप्रमाणे ४ डिसेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या या मालिकेला आता अॅडिलेड कसोटीपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. बॉक्सिंग डे कसोटी २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत आयोजित होण्याची शक्यता आहे. सिडनी कसोटी (३ ते ७ जानेवारी) यानंतर खेळल्या जाण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)