प्रो लीगने कबड्डीचा रोमांच वाढविला!
By Admin | Updated: August 30, 2014 04:07 IST2014-08-30T04:07:57+5:302014-08-30T04:07:57+5:30
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगची ग्रॅण्ड फायनल पुढे आहे. या लीगने स्पर्धा कशी आणि किती शिस्तबद्ध पण भव्यदिव्य करायची याचे आदर्श उदाहरण घालून दिले

प्रो लीगने कबड्डीचा रोमांच वाढविला!
सुरजीत नरवाल ,
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगची ग्रॅण्ड फायनल पुढे आहे. या लीगने स्पर्धा कशी आणि किती शिस्तबद्ध पण भव्यदिव्य करायची याचे आदर्श उदाहरण घालून दिले. कबड्डीची जी रोमहर्षकता या स्पर्धेने दर्शविली आणि फायनलमध्ये पुन्हा ती दिसेलही. पण यामुळे ही स्पर्धा जगातील उत्कृष्ट कबड्डी स्पर्धा ठरणार हे निश्चित.
या स्पर्धेकडून आणि त्यात सहभागी झालेल्या खेळाडूंकडून अपेक्षा मोठ्या असल्याने फायनलमध्ये उच्चप्रतिच्या खेळाचे दर्शन घडेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. ही लीग युवा टॅलेंटसाठी उपयुक्त सिद्ध होणार आहे. अंतिम सामना कुणादरम्यान होईल याचा वेध घेणे कठीण असले तरी निकाल चांगलाच येण्याची दाट शक्यता आहे. जे संघ जिंकण्याच्या निर्धाराने खेळतील ते बाजी मारतील. अजय ठाकूर आणि अनुप कुमार हे कबड्डीतील मोठे टॅलेंट असलेले युवा खेळाडू आहेत. या दोघांच्या खेळामुळे प्रेक्षक चांगलेच प्रभावित होत आहेत.
क्षमतेबाबत बोलायचे झाल्यास अनुप हा अधिक आत्मविश्वासू आहे. मुंबईचे प्रेक्षक त्याला अधिक चीअरअप करतील, असे दिसते. माझा देखील तो फेव्हरिट कबड्डीपटू. त्याचा संघ विजयी झाल्यास मला देखील अतिशय आनंद होईल.
अजय ठाकूर हा देखील विश्वदर्जाचा रेडर आहे.पण महत्त्वाचे असे की तो सांघिक खेळावर भर देतो. त्याच्यात भरपूर नैसर्गिक टॅलेंट आहे यात शंकाच नाही. त्याची चढाई इतकी जलद आहे की प्रतिस्पर्धी बाचव फळीला तो हालवून सोडतो. त्याचे हल्ला करण्याचे कौशल्य इतके अप्रतिम आहे की प्रतिस्पर्धी खेळाडूला क्षणार्धात टिपताना पाहणे प्रेक्षकांसाठी नवा अनुभव ठरतो.
पाटणा पायरेट्सचे खेळाचे तंत्र आणि पूर्व इतिहास पाहिला तर ते जयपूर पिंक पँथर्सविरुद्ध लढत देताना संघात काही पॉवरफुल खेळाडूंचा भरणा करतील. अंतिम सामन्यात आक्रमकपणा हा आणखी एक निर्णायक ‘फॅक्टर’ राहणार आहे.
बुल्स संघातील नरवाल हा देखील आणखी एक धोकादायक खेळाडू आहे. त्याचे शरीर, पॉवर आणि आक्रमकपणा हा सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दडपण वाढवितो. या आधीच्या सामन्यात त्याची चपळता आणि गडी खेचून आणण्याची क्षमता सर्वांनी अनुभवली आहे. अनुभवी खेळाडूंचा भरणा हा युवा खेळाडूंसाठी संघात बोनस असतो. मैदानावर खेळणारे खेळाडू आणि सामना पाहणारे प्रेक्षक यांच्यामुळे सायंकाळची रोमहर्षकता कशी शिगेला पोहोचलेली जाणवते. स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीग ही प्रत्येकासाठी आपले टॅलेंट दाखविणारे मोठे व्यासपीठ आहे. (टीसीएम)
(सुरजीत नरवाल हा दबंग दिल्लीचा स्टार रेडर आहेत.)