प्रो कबड्डीचा दिमाखदार ‘पंगा’ सुरू

By Admin | Updated: July 19, 2015 01:10 IST2015-07-19T01:10:52+5:302015-07-19T01:10:52+5:30

बॉलिवूडपासून कॉर्पोरेटजगतातील सर्वांनाच आकर्षित केलेल्या प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राला शनिवारी रात्री मुंबईतील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे दिमखात सुरुवात झाली.

The pro Kabadi celebrated 'Panga' continues | प्रो कबड्डीचा दिमाखदार ‘पंगा’ सुरू

प्रो कबड्डीचा दिमाखदार ‘पंगा’ सुरू

- रोहित नाईक,  मुंबई
बॉलिवूडपासून कॉर्पोरेटजगतातील सर्वांनाच आकर्षित केलेल्या प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राला शनिवारी रात्री मुंबईतील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे दिमखात सुरुवात झाली. ‘बिग बी’ महानायक अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत गाऊन प्रो कबड्डी दुसऱ्या सत्राच्या उद्घाट्न कार्यक्रमाला ‘चार चाँद’ लावले.
वरळी एनएससीआय स्टेडियमच्या परिसरात शनिवार संध्याकाळी ५ वाजल्यापासूनच कबड्डीप्रेमींची गर्दी होऊ लागली. एनएससीआयला प्रो कबड्डीच्या निमित्ताने झालेली गर्दी यामुळे वरळी सीफेस परिसर चांगलाच गजबजला होता. तरुणाईचा या वेळी मोठा उत्साह दिसून आला.

नेता, अभिनेता
आणि उद्योगपती....
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला या वेळी राजकारणी मंडळींपासून बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी आवर्जून उपस्थिती लावून रंगत निर्माण केली. यामध्ये केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष भाई जगताप, भाजपाच्या एन. सी. शायना, महानायक अमिताभ बच्चन, जयपूर संघमालक अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, जया बच्चन, रितेश देशमुख, जेनेलिया डीसूझा,
ॠषी कपूर, सुनील शेट्टी, आमिर खान, सोनू सूद, माजी क्रिकेटपटू कपिल देव, प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा, मुंबई संघमालक रॉनी स्क्रूवाला यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले.

मुंबई-पुणे महाराष्ट्राचे डोळे...
प्रो कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे दोन संघ आहेत. तुमचा पाठिंबा मुंबईला असेल की पुणे संघाला? या कोड्यात पाडणाऱ्या प्रश्नाचे चतुराईने उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की हा प्रश्न म्हणजे तुम्हाला डावा डोळा आवडतो की उजवा, असा प्रश्न विचारण्यासारखं. तसेच कबड्डी महाराष्ट्राच्या रक्तात असून, महाराष्ट्राचा हा खेळ अजून पुढे जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

मी इथे कबड्डीच्या प्रसारासाठी आलो आहे. या स्पर्धेद्वारे कबड्डीला नवी ओळख मिळाली असून, कबड्डीला मिळालेला ग्लॅमर खूप महत्त्वाचा आहे. पुढील काही वर्षांत हा खेळ लवकरच जागतिक स्तरावर चमकेल, हा विश्वास आहे.
- सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय क्रीडामंत्री

प्रो कबड्डीचे एक वर्ष कसे निघून गेल कळलेच नाही. ज्या ठिकाणी आम्ही विजेतेपद पटकावले होते त्याच ठिकाणी आम्ही आमचा पहिला सामना खेळलो. विजेतेपद राखण्याच्या दृष्टीनेच आम्ही प्रत्येक सामना खेळणार आहोत. प्रो कबड्डीला जो काही प्रतिसाद मिळाला तो अविश्वसनीय होता.
- अभिषेक बच्चन, जयपूर पिंक पँथर - संघमालक

Web Title: The pro Kabadi celebrated 'Panga' continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.