शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

Pro Kabaddi League : यू मुंबाने घडवला इतिहास, घरच्या मैदानावर 'हा' विक्रम नोंदवणारा पहिलाच संघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 16:48 IST

Pro Kabaddi League: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रात विक्रमांचे सत्र इंटर झोन चॅलेंजमध्येही सुरू आहे.

ठळक मुद्दे प्रो कबड्डीच्या इंटर झोन चॅलेंजमध्येही विक्रमांचे सत्र सुरू यू मुंबाने घरच्या प्रेक्षकांसमोर केली उल्लेखनीय कामगिरीतमीळ थलायव्हाजचा पराभव करून घेतला विजयी निरोप

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रात विक्रमांचे सत्र इंटर झोन चॅलेंजमध्येही सुरू आहे. यू मुंबाने गुरुवारी घरच्या मैदानावर अखेरच्या लढतीत तमीळ थलायव्हाजवर एकहाती विजय मिळवला. घरच्या प्रेक्षकांसमोरील अखेरच्या सामन्यात यू मुंबाने 36-22 असा विजय मिळवताच ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. इंटर झोन चॅलेंजमध्ये घरच्या मैदानावर आत्तापर्यंत एकाही संघाला सलग चार सामने जिंकता आले नव्हते, परंतु यू मुंबाने हा पराक्रम करून दाखवला.यू मुंबाने 'A' गटात 14 सामन्यांत 10 विजय मिळत 56 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. तमीळ थलायव्हाज संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी यजमानांनी हरयाणा स्टीलर्स, यूपी योद्धा आणि बेंगळुरु बुल्स या संघाना पराभूत केले होते. त्यामुळे थलायव्हाजविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून ते विक्रम करतात का, याची उत्सुकता लागली होती. त्यांनी अगदी सहजतेने विजय मिळवून घरच्या प्रेक्षकांचा निरोप घेतला.यू मुंबाच्या दर्शन कॅडियनने 6, सिद्धार्थ देसाई आणि विनोद कुमार यांनी प्रत्येकी 5 गुणांची कमाई केली. कर्णधार फझल अत्राचलीने पकडीत आपला दम दाखवला. त्याने या सत्रात पकडीच्या गुणांचे अर्धशतकही साजरे केले. पकडीच्या गुणांत तो (57) अग्रस्थानावर आहे. चढाईत सिद्धार्थने 131 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे.

टॅग्स :PKL 2018प्रो कबड्डी लीग