Pro Kabaddi League 2021-22: दिल्लीची दबंगगिरी..!! गेल्या वर्षीचे चॅम्पियन्स 'बंगाल वॉरियर्स'ना अक्षरश: लोळवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 11:14 PM2021-12-29T23:14:52+5:302021-12-29T23:16:08+5:30

दुसऱ्या सामन्यात हाफ टाईमनंतर गुजरात जायंट्सने यूपी योद्धाशी बरोबरीत सोडवला सामना

Pro Kabaddi League 2021 PKL Live Updates Dabang Delhi vs Bengal Warriors Up Yoddha vs Gujarat Giants | Pro Kabaddi League 2021-22: दिल्लीची दबंगगिरी..!! गेल्या वर्षीचे चॅम्पियन्स 'बंगाल वॉरियर्स'ना अक्षरश: लोळवलं

Pro Kabaddi League 2021-22: दिल्लीची दबंगगिरी..!! गेल्या वर्षीचे चॅम्पियन्स 'बंगाल वॉरियर्स'ना अक्षरश: लोळवलं

Next

Pro Kabaddi League 2021 Day 9 Live: प्रो कबड्डीच्या आजच्या दिवसात दोन विरूद्ध प्रकारचे सामने झाले. पहिल्या सामन्यात दिल्ली दबंगने संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखत बंगाल वॉरियर्सला एकतर्फी लोळवलं. तर दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धा आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. दिल्लीने तिसरा विजय मिळवत यंदाच्या हंगामात अजिंक्य राहाण्याची मालिका कायम ठेवत अव्वल स्थानी झेप घेतली. तर यूपी योद्धाशी सामना बरोबरीत सोडवून गुजरात जायंट्सचा संघही दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला.

दिल्लीचा बंगालवर धडाकेबाज विजय (५२-३५)

दोन विजय आणि एक टाय असा प्रवास करून आज दिल्लीचा संघ आज गतविजेत्या बंगाल वॉरियर्ससमोर उभा ठाकला. आपला विजयरथ वेगाने पुढे नेत त्यांनी आक्रमक सुरूवात केली. झटपट गुण मिळवत त्यांनी बघताबघता सामन्यावर पकड मिळवली. हाफ टाईमपर्यंत दिल्लीने ३३-१५ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धातही त्यांनी तुफान चढाई केली आणि एकतर्फी विजय मिळवला. नवीन कुमारने एकट्याने २१ रेड पॉईंट्ससह २४ गुण मिळवत विजयात सिंहाचा वाटा उचलला.

--

गुजरातची यूपीशी बरोबरी

पहिला सामना एकतर्फी झाला असला तरी गुजरात आणि यूपी योद्धा यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला.  पू्र्वार्धापासून ते उत्तरार्धाच्या शेवटापर्यंत सामन्यात गुणांचा फरक फारसा दिसून आला नाही. कधी गुजरात पुढे तर कधी यूपी योद्धा पुढे हा सामना रंगला. मात्र अखेरीस दोन्ही संघ ३२-३२ अशा गुणांवर राहिले. यूपी योद्धाकडून प्रदीप नरवालने सर्वाधिक १० रेड पॉईंट्स तर गुजरातकडून राकेश नरवालने ११ रेड पॉईंट्स मिळवले.

Web Title: Pro Kabaddi League 2021 PKL Live Updates Dabang Delhi vs Bengal Warriors Up Yoddha vs Gujarat Giants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.